
नविन नांदेड। विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थिती नुसार शैक्षणिक अभ्यास क्रमामध्ये अग्रेसर राहुन संस्थेचा नाव लोकिक वाढवला पाहिजे, असे प्रतिपादन सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापक अध्यक्ष डॉ. नानासाहेब जाधव केले.

सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नानासाहेब जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळयाचा निमित्ताने आश्रम शाळा गांधीनगर विद्या संकुल व प्राथमिक ,माध्यामिक , कनिष्ठ महाविद्यालय, गांधीनगर, तालुका कंधार येथे अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन दि.१ जानेवारी करण्यात आले होते, त्याप्रसंगी अभिष्टचिंतन सोहळ्याला उत्तर देताना डॉ. नानासाहेब जाधव बोलत होते.

या वेळी नानासाहेब जाधव यांनी अभिष्टचिंतन सोहळयाने भारावून गेल्याचे सांगुन स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वंसतराव नाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय सह, महात्मा गांधी बी.एड. ईतर शाळा मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व लातूर बोर्ड मध्ये अनेक विद्यार्थी यांनी यश संपादन करून संस्थेच्ये शाळेच्या निकाल शंभर टक्के लागले. संस्थे अंतर्गत विविध शाळा मध्ये ५५०० विद्यार्थी असल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांत आलेल्या अडीअडचणी बाबतही माहिती दिली.

या अभिष्टचिंतन सोहळया मध्ये सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका २३ चे प्रकाशन, कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव पुस्तक प्रकाशन,व विविध दैनिकांच्या प्रकाशन सोहळा करण्यात आला तर प्रांरभी डॉ.नानासाहेब जाधव यांच्यी साखर तुला कुटुंबाचा व सेवादास परिवाराच्या ऊपसिथीत फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये करण्यात आली.

तर क्रेनचा साह्याने डॉ.मोहन चव्हाण यांनी पुष्पहार घालून सह परिवार स्वागत केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोती जाधव, तर प्रमुख पाहुणे शांतादेवी जाधव,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष डॉ.मोहन चव्हाण, कल्याण राठोड,धुमासिंग जाधव, भिमराव जाधव, डॉ.प्रदिप जाधव, डॉ.रेणुताई जाधव,नगरसेवक अँड.श्रीनिवास जाधव ,सौ.निलमताई जाधव, नगरसेवक राजू काळे, प्रशांत अण्णा तिडके, राठोड एस.ए. प्राचार्य डॉ.डब्लु ,आर,मुजावर, प्राचार्य डॉ.शेखर घु़ंगरवार यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी प्रास्ताविक विश्वनाथ कानवटे, यांनी तर सूत्रसंचालन मोतीराम थोटे तर आभार प्रदर्शन सिताराम पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक क्षेत्रीय जे.डी, एस.आर कांगणे,ताटे,बी.बी. राठोड, एस.एम. शेटकर, व्हि. व्हि,गिते, एम.बी.बळवंते, मांजरकर ए.जी. एस.एच.मेहरकर,ताटे एच एम,केद्रे एम.के,कारामुंगे के.एल.पदमवार बि.डी,होळगे ए.जी., एम.एम.होनवडजे, वाघमारे आर.जी,पल्लेवाड एम एल,कल्याणकर एम.एम,पवार एल आर आदींनी पुढाकार घेतला होता. यावेळी परिसरातील व ग्रामीण भागातील नवनिर्वाचित संरपच, ऊपसंरपच , तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी हभप राधाबाई सानप यांचा किर्तन कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्याला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालकांच्या ग्रामस्थ व सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

