
नांदेड, गोविंद मुंडकर। नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली, देगलूर, धर्माबाद या तालुक्यातील सीमावर्ती भागातील गावांच्या विकासाबात लवकर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. याविषयी प्रंशासन गंभीर असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट करत. ५ जानेवारी २०२२ रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते. आचारसंहितेमुळे व्यापक बैठक घेता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

बिलोली, देगलूर, धर्माबाद आदी तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील शेकडो गावातील शेतकरी व नागरिकांना लगतच्या तेलंगणा राज्यातील सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या सोई सुविधा पाहून तेलंगणात जाण्याची मानसिकता होत आहे. जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील गावांचा तेलंगणाच्या धर्तीवर विकास करा अन्यथा आम्हाला तेलंगणात जाऊ द्या अशी काही लोकांनी मागणी केली होती. अशा मागणीपेक्षा समन्वयाने काम व्हावे म्हणून प्रश्न सीमावर्ती भागाचे… या माध्यमातून समन्वय समिती कार्यरत आहे.

गत चार वर्षापासून प्रश्न सीमावर्ती भागाचे या समितीच्यावतीने बिलोली सह अन्य तालुक्यातील सीमावर्ती भागाच्या विकासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे पाठपुरावा करण्यात आला. तीन वर्षापुर्वी समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे याच्यासह लोक प्रतिनिधींनी सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी विशेष धोरण आखण्याची तयारी केली होती.

मात्र कोरोनाच्या परिस्थिती नंतर सिमा भागातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले. तेलंगानाच्या धरतीवर नाही तर मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाच्या धर्तीवर तेलंगणा सीमावरती भागातील विकासाचा अनुशेष भरून काढावा अशी मागणी जोर धरू लागली. दरम्यान ५ जानेवारी २०२२ बैठक घेण्यात येणार असल्याचे सीमा भागात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट करण्यात केले होते माञ आचारसंहितेची बाब लक्षात घेता व्यापक बैठक नंतर घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

