
हदगाव, गजानन जिदेवार। जिल्हा परिषद हायस्कूल आष्टी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डांगे मॅडम, उपाध्यक्ष गंगासागर मॅडम व प्रमुख पाहुणे मालती शिंदे या होत्या. मान्यवरांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन करून सावित्रीच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे घेतली. सारिका कांडले, कल्याणी चव्हाण, गायत्री इंगोले, आकांक्षा ढोले, अनुराधा कऱ्हाळे, प्रतीक्षा वाघमारे, नागेश मेघा, दुर्गा शिंदे, सार्थक इंगोले, इ विद्यार्थी भाषणात सहभागी होते.

मालती शिंदे यांनी “मुलगी शिकली, प्रगती झाली” याचे महत्त्व पटवून सांगितले, गंगासागर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, डांगे मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप केला.आभार प्रदर्शन काकडे यानी केले, सूत्रसंचालन पांगरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाम्बरे सर, भुरके सर, पवार सर यांनी मेहनत घेतली.

