
भोकर। तालुक्यातील उभरत नेतृत्व युवकाचे प्रेरणा स्थान इंजि. विश्वांभर पवार यांचा वाढदिवस जिवन आधार ब्लड बँक नांदेड येथे स्वःता व ईतर १० जणांनी रक्तदान करून अगदी साध्या पद्धतीने साजरा केला वाढदिवसावर होणारा अनाठायी खर्चाला फाटा देत ते रुपये तालुक्यातील चालू वर्षीच्या पावसाळ्यात विज पडून मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून देण्यात आली असून यामुळे तालुक्यात एक नवीन व चांगला पायंडा पडायला सुरूवात झाली असल्याची चर्चा होत आहे.

भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा नाम फाऊंडेशन चे तालुका समन्वयक, मराठवाडा जनता विकास परिषद तालुकाध्यक्ष,पाणी फाऊंडेशन तालुका समन्वयक इंजि. विश्वांभर पवार हे जरी राजकारणी असले तरी अंशी टक्के समाजकारण व विस टक्के राजकारण करीत असतात.

शेतकरी कुटुंबातील असल्याने व गरीब परिस्थिती ची जाणीव असल्याने सद्या वाढदिवस,लग्न वाढदिवस अशा वेळी अनेक जण नको तितका अनाठायी खर्च करत असतात परंतु सामाजिक भान असलेले,समाजाचे काही देणे असते या भावनेतून राजा सारखे मन मनासारखा राजा असलेला राजा माणूस इंजि. विश्वांभर पवार यांनी आपला वाढदिवस अगदी साध्या पणाने साजरा करुन यावर होणारा खर्च भोकर तालुक्यातील पावसाळ्यात विज पडून मृत झालेल्या भुरभुशी,पाळज, दिवशी, पिंपळढव,येथील कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक मदत स्वरूपात ७ कुटुंबीयांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून दिली आहे.पाळज येथील श्री गणपती मंदिरात त्यांच्या मित्रमंडळा कडून दीर्घायुष्य लाभावे याकरीता आरती केली.

समाजात आर्थिक परिस्थीती बिकट असलेले व नैसर्गिक आपतीमुळे अडचणीत सापडलेले, दुर्धर आजाराने त्रस्त, कर्जबाजारीपणामुळे नैराश्यग्रस्त झालेले अशांना आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता असते अशावेळी स्वतःला समाजसेवक, पुढारी,श्रीमंत म्हणून घेणाऱ्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी,पार्टी चे आयोजन इत्यादि वर वायफळ खर्च न करता समाजातील अशा गरजू लोकांना, विद्यार्थ्याना,अनाथ लेकरांना जर मदत केली तर समाजात एक प्रकारे वेगळा आदर्श निर्माण होऊन समाजातील गरजूंना तेवढीच मदत होईल.नेमकी हीच बाब लक्षात घेऊन इंजि. पवार यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरील आपत्ती ग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत केल्याने त्यांच्या या कामाचे तालुकाभर कौतुक होत असून हा विषय चर्चेचा ठरत आहे.

