
हदगाव, गजानन जिदेवार। हदगाव शहरात सध्या नवीन फिल्टर च्या पाण्याच्या नळ योजनेचे काम चालू आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असताना दिसून येत आहे. त्यातच रामराव पाटील हायस्कूल ते संभाजीनगर पाटीपर्यंत सी.सी. रोड मध्यस्थी फोडून रोडवर मोटरसायकल स्वरणा तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तसेच नागसेन नगर व संभाजी नगर मध्ये ये-जा करण्यासाठी स्कूल बस पाण्याची वाहणे तसेच फोर व्हीलर यांच्या चेंबरला खालून रोड फोडून काढलेले दगड व मातीच्या ढिगार्याने मोठे नुकसान होत आहे. हदगाव नगर परिषद कार्यालयाने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे.तसेच संबंधित गुत्तेदारास रोड लवकरात लवकर लेवल करण्यास सांगावे. असे नागसेन नगर तसेच संभाजीनगर वासियाकडून बोलल्या जात आहे.

नागसेन नगर हे आधीच दलित वस्ती मध्ये गेले असल्या कारणाने गेली दहा वर्ष झाली आहेत अजून सी.सी. रोड ची साधी दुरुस्ती सुद्धा झाली नाही. त्यातच या पाईपलाईनच्या भोंगळ कारभारामुळे त्या सी.सी. रोडचे ऐशी-तैशी होताना दिसत आहे.वाहनधारकांची होणारी हेळसांड थांबवावी तसेच नागसेन नगर व संभाजीनगर वासियाकडून खोदकाम केलेल्या रोडवर दबई फिरवून रोड लेवल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

