अर्धापूर, नीळकंठ मदने। भाजपा व भाजयुमोच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते म्हणणारे अपमानजनक विधानाचा निषेध करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध केला तर कामठा येथे पुतळास जोडे मारण्यात आले.
विरोधी पक्षनेते अजीत पवार यांचा अर्धापूरातील बसवेश्र्वर चौकात निषेध करण्यात आला, यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख, भाजपाचे गटनेते बाबूराव लंगडे, प्रल्हाद माटे, सुधाकर कदम, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,डॉ लक्ष्मण इंगोले,विराज देशमुख,शहराध्यक्ष विलास साबळे, अवधूत कदम, नागोराव भांगे,रामराव भालेराव,जठन मुळे,गोविंद माटे,तुकाराम माटे,बालाजी गंधनवाड, योगेश हाळदे,वैभव माटे यांनी निषेध केला,तर कामठा (बु) येथे अजीत पवार यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष जठन पाटील मुळे,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा इंगोले, उपाध्यक्ष आनंद वैद्य चिटणीस तुळशीराम बंडाळे सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष कुश भांगे,हेमंत देशमुख,निलेश आपणगिरे देविदास कल्याणकर,साई बारसे,रवी इंगळे,परमेश्वर लालमे, गिरीधर पवार, कृष्णा शिंदे,महेश राजगोरे, मुंजाजी राजेगोरे, विश्वनाथराव खुळे, विक्रम शिंदे, राम कदम, उद्धव जाधव,गजानन काळे,विकास बंडाळे, नामदेव उबाळे, शिवराम साखरे,सतीश कल्याणकर, गोविंद नवले आदींची उपस्थिती होती.यावेळी पोलिस निरीक्षक अशोक जाधव व फौजदार सरोदे यांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.