
भोकर। प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड आणि येथील दुचाकी विक्रेता यांच्याकडून शहरात आज ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता रस्ता सुरक्षा हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दुचाकीवरून विना हेल्मेट प्रवास करताना अपघात होऊन जीव गमवाव्या लागल्याच्या घटनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे केले आहे.मात्र हेल्मेट बाबत दुचाकीस्वार गांभीर्याने घेत नाहीत. याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून रस्ता सुरक्षा हेल्मेट रॅलीस प्रारंभ होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहदिवाणी न्यायाधीश डी डी वाघमारे यांची उपस्थिती असणार आहे तर रॅलीचे उद्घाटन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत ,तहसीलदार राजेश्वर लांडगे, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे ,प्राचार्य पंजाब चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे यांची उपस्थिती असणार आहे.

यावेळी मोटार वाहन निरीक्षक मनोज चव्हाण, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण राहणे हे हेल्मेट वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन दुचाकीविक्रेता प्रशांत पतंगे,हाजी खाजा, मुन्ना सेठ यांनी केले आहे.

