
शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील मौजे मलकजाम येथे काल दि.०३ जानेवारी रोजी सरपंच सौ.सुनीता सत्यनारायण पोगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच शेख आशरफबी शेख ईशाख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.तद नंतर सदरील निवडीसाठी तालुक्याचे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निरीक्षक म्हणून व्ही.व्ही. जळमकर सह तलाठी विश्वास फड व ग्रामसेवक संजय निलेवाड पोलीस पाटील नागेश पोगुलवार आदींची उपस्थित होती.

किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तेलंगणा सीमेवरील मलकजाम या गावाला मोठी राजकीय वारसाची ओळख असून येथील भूमिपुत्र माजी महसूल राज्य मंत्री डी. बी.पाटील यांनी आमदार,खासदार,मंत्री पदावर राहिले होते.या मुळेच येथे आज पर्यंत ग्रामपंचायत स्थरावर निवडणूक हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध होत असते.माजी महसूल राज्य मंत्री डी. बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच पदाचा उमेदवार असतो.

अगदी या वेळी सुद्धा सरपंच पदाचे उमेदवार म्हणून एका सामान्य परिवारातील महिला सौ.सुनीता सत्यनारायण पोगुलवार यांना सरपंच पदाचा बहुमान देऊन जन्म भूमी असलेले मलकजाम येथे बिनविरोध सरपंच म्हणून निवड करण्यात आले.या अनुषंगाने काल उपसरपंच पदी म्हणून अल्पसंख्याक परिवारातील शे.अशराफबी शेख ईशाख ह्या महिलेचे निवड करण्यात आले. करीता आता मलकजाम येथे सरपंच उपसरपंच महिला असून ग्रा.पं.सदस्य अनुसयाबाई येरपुलवार,सुमनबाई अंगरवार,शोभाबई गंगाधर,गजानन सूर्यवंशी असे असून इतर दोन जागा रिक्त आहेत.

या निवडीदारम्यान सरपंच प्रतिनिधी सत्यनारायण पोगुलवार ,शेख ईशाख सह ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सह गावातील नागरिक उपस्थित होते. या वेळी सरपंच सौ.सुनीता पोगुलवार व उपसरपंच शेख आशरफबी शेख ईशाख सह ग्रामपंचायत सदस्यांनी माजी महसूल राज्य मंत्री डी. बी.पाटील यांचे आभार मानले व मालकजाम गावाचा विकास आपल्या मार्गदर्शनाने होईल असे मत व्यक्त करत गावकऱ्यांचे आभार मानले. उपस्थितांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

