
नांदेड। धर्मवादी देशाला विषारी फळॆ देत आहेत. माणसा माणसांमध्ये भेद निर्माण करणारी वृक्षवल्ली वाढत आहे. सर्वच राजकीय पक्ष राजकारण करीत आहेत त्यामुळे शत्रू ओळखणं अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरवाद्यांनी सावध व्हायला हवे, असे प्रतिपादन रमेश सोनाळे यांनी केले.
भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या औचित्याने रिपब्लिकन हक्क परिषदेच्यावतीने येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्यासमोर भीमा कोरेगाव शोर्य स्तंभाच्या प्रतीकृतीस अभिवादन व रिपब्लिकन पुरस्कार वितरण व प्रेमानंद जोंधळे विचारमंचावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत पंय्याबोधी हे होते. कार्यक्रमास भदंत उपगुप्त महाथेरो, कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईतील सरसेनापती वीर शिदनाक महार यांचे १२ वे वंशज मिलिंद राजाराम ईनामदार, १३ वे वंशज अभिजीत इनामदार, जगदिश ओहोळ, मिलिंद लोनपांडे, फारूख अहमद, माजी नगरसेवक किशोर भवरे, दुष्यंत सोनाळे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते एस.एन. गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.विलास ढवळे यांनी केले.
प्रारंभी भीमा कोरेगाव स्मृतीस्तंभाच्या भव्य प्रतिकृतीस अभिवादन करण्यात आले. भदंत उपगुप्त महाथेरो यांनी वंदना व धम्मदेसना दिली. मिलिंद ईनामदार, अभिजीत ईनामदार, फारूख अहमद, मिलिंद लोनपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. भदंत पंय्याबोधी यांनी अध्यक्षीय समारोप केला. आंबेडकरी समूहांनी एकत्रित येऊन समूहाने सर्व समस्यांची सोडवणूक केली पाहिजे. भविष्यातील राजकीय घडामोडींकडे लक्ष वेधून समाजाने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रमेश सोनाळे यांना हर घर संविधान या मिलिंद लोनपांडे यांनी सुरू केलेल्या अभियानाचे मराठवाडा विभाग संयोजक म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच सरसेनापती वीर शिदनाक प्रेरणा प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व मराठवाडा प्रमुख पदी निवड करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन हक्क परिषदेच्यावतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पूर्णा येथील भदंत उपगुप्त महाथेरो यांना धम्मरत्न पुरस्कार, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यम संकुलाचे विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र गोणारकर यांना रिपब्लिकन रत्न पुरस्कार, पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांना सरसेनापती वीर शिदनाक महार रिपब्लिकन शौर्य पुरस्कार, पत्रकार हरिहर धुतमल यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, सदाशिव गच्चे यांना रिपब्लिकन विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले.
यावेळी भगवान गजभारे, शिवाजी कांबळे, विकी वाघमारे, प्रभाकर राक्षसमारे, संजय राक्षसे, केतन खिल्लारे, संजय भालेराव आणि धम्मा जोंधळे यांना रिपब्लिकन मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्रफुल्ल सावंत, संजय भोकरे कवठेकर, माजी नगरसेवक सुरेश हटकर, प्रा. गणेशराज सोनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास आंबेडकरी समुदाय मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
या बातम्या देखील आपणास आवडतील
- स. राजिंदरसिंघ सिलेदार यांचे निधन -NNL
- …आणखी संपन्न, समृद्ध महाराष्ट्रासाठी एकजूट होऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL
- १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नांदेड केंद्रावर कुसुम सभागृह येथे झाली संपन्न -NNL
- श्री ज्योतिबा देवस्थानची भूमी लुटणार्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावनी -NNL
