
उस्माननगर, माणिक भिसे। ( मोठी लाठी) ता.कंधार येथील सौ. प्रणिता रविंद्र देशपांडे( लाठकर) यांनी ” किर्तनाच्या अनुषंगाने महाभारतातील प्रमुख स्री व्यक्तिरेखांत आख्यानातील चिकित्सक अभ्यास ” या विषयावर लिहिलेल्या शोधनिबंधास “कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाने डॉक्टर ऑफ फिलासॉफी मध्ये पीएचडी प्रदान केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते अकराव्या दीक्षांत समारंभात रामटेक येथे पीएचडी प्रदान करण्यात आली.वैदर्भीय हरीकिर्तन संस्थेच्या महाविद्यालयातून कीर्तनातील पीएचडी मिळवणा-या त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.

सौ. प्रणिता देशपांडे यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. उस्माननगर येथील देशपांडे ( लाठकर) परिवारातील अनेकांनी शिक्षणातून उतुंग यश संपादन करून शासन, प्रशासकीय सेवा करण्याची प्रेरणादायी परंपरा निर्माण केली आहे.

प्रणिता ताईंनी सुद्धा ती यशस्वीपणे सांभाळली आहे. याबद्दल विशेष कौतुक गावकरी मंडळींतून व्यक्त केले जात आहे. प्रणिता ताईंच्या या यशाबद्दल उस्माननगर पत्रकार संघाच्या वतीने गणेश लोखंडे, माणिक भिसे, प्रदिप देशमुख, लक्ष्मण कांबळे, सुर्यकांत मालिपाटील, विठ्ठल ताटे, देविदास डांगे, अमजद पठाण लक्ष्मण भिसे, आदींनी अभिनंदन केले आहे.

