
हिमायतनगर। कारला येथील रहिवासी लक्ष्मीकांत गोपीनाथ लुम्दे याने इयत्ता 5 वी मध्ये अभ्यास करून नवोदय च्या परिक्षेत यश मिळवले असुन त्याच्या यशाबद्दल कौतुक होत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील लक्ष्मीकांत लुम्दे या विद्यार्थ्यांने नयोदय विद्यालयात यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेऊन अभ्यास केला. त्यांनी सतत केलेल्या अभ्यासामुळे नवोदय विद्यालय बेलोरा ता. घाटंगी जि. यवतमाळ येते त्याची पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.

नयोदय मार्गदर्शक साई कोथळकर यांना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल रमेश कदम ,सरपंच गजानन कदम , प्रा. डि. डि. घोडगे,डॉ गफार, मारोती पाटील लुम्दे, गोपीनाथ लुम्दे, सोपान बोम्पिलवार,नागेश कोथळकर, मिर्झा ,यांच्यासह कारला ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

