
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत व सांस्कृतिक विभागातर्फे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

तमाम स्त्री उद्धारासाठी ज्या मातेने स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक हाल-अपेष्टा सहन केल्या. तसेच सेन, माती दगड-धोंडे झेलून दलित व स्त्री उद्धारासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आपला पती महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक न्याय हक्कासाठी अहोरात्र झटत राहिल्या म्हणूनच की काय, फुले दाम्पत्यांनी केलेल्या शिक्षण क्रांति मुळे आजचा बहुजन समाज व स्त्रीयांनी आपली प्रगती साधली.

आशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आपण मोठ्या उत्साहात साजरी करत असताना त्यांच्या विचार आचारांना स्मरून त्यांनी सांगितलेल्या वाटेवरून जाण्याचा प्रयत्न आजच्या समाजांनी करावा. असा मोलाचा संदेश क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमिताने मंचावरून बोलताना कार्यक्रमाचे प्रमूख पाहुणे डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रंथपाल बोंबले राजू व आभार डॉ .श्याम इंगळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ. शेहनाज मॅडम , प्रा. गुंडाळे सर, डॉ. माने सर, डॉ. संगपाल इंगळे सर , कोल्हेवाड सर ,देशपांडे सर,डोंगरगावकर सर,चंदापुरे सर ,साहेबराव सर,सचिन सर,राहुल भरणे , प्रभू पोरजवार , मस्के ताई व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

