
हिमायतनगर। 50 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद हायस्कूल हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आले होते.


या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये तालुक्यातील एकूण 20 शाळांनी सहभाग नोंदवला.


प्रथम क्रमांक ‘ टाकाऊ पासून टिकाऊ गणितीय मॉडेल’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरसनी यांना तर द्वितीय क्रमांक ‘ पर्यावरण स्नेही सौर जहाज’ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सिरंजनी यांना देण्यात आला. इयत्ता नववी ते बारावी गटामध्ये ‘ विज्ञान आणि तंत्रज्ञान’ राजा भगीरथ माध्यमिक विद्यालय धानोरा यांना प्रथम क्रमांक देण्यात आला.


तसेच अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धा (प्राथमिक शिक्षक ) या गटांमध्ये श्री. कंधारे सर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरसनी यांना प्रथम क्रमांक व शंकर गच्चे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायवाडी यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शि. वि.अधिकारी, एस.डी. चव्हाण सर (गोंदियावाले ) गटसाधन केंद्र हिमायतनगर सर्व केंद्रप्रमुख, BRC कार्यालयाचे सर्व विषय शिक्षक व विषय तज्ञ यांनी मोलाचे सहकार्य केले.
