
नविन नांदेड। जिल्हा परिषद शाळा जुना कौठा शैक्षणिक सहल अंतर्गत ऐताहासिक स्थळे पाहण्यासाठी औरंगाबाद, भद्रा मारोती,वैरूळ लेण्या, घृष्णेश्वर, दौलताबाद, देवगिरी किल्ला,बिबीका मुकबरा, पवनचक्की,आदी स्थळे पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी सह शिक्षक यांनी भेट देऊन माहिती घेतली,आंंनदाचा वातावरण व उत्साहात हि सहल संपन्न झाली.

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रल्हाद पाटील काळे, निळकंठ काळे, बालाजी गोरे, गोविंद गोरे,व व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या ऊपसिथीत दिनांक २९ डिसेबंर २२ रोजी शैक्षणिक सहलीचा गाडीस हिरवी झेडी दाखवली.

यावेळी नवयुवक मंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व पालकांची ऊपसिथीत होते यावेळी आनंदाच्या उत्साहात शिवगर्जना, व जय मल्हारचा गजर करत सहलील शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्याध्यापक नवहारे मंगल पवार सी, एस ,सौ पवळे एम.एल, श्रीमती पटणे व्ही. के व भोजनाप्रमुख ,सौ मैनाबाई बालाजी गोरे, पत्रे, शैबलवार, वरील सर्वानी सहल यशस्वीसाठी अतिशय मोलाचे, सहकार्य करून ३० डिसेंबर रोजी कौठा जुना येथे मुक्कामी पोहचली.

सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळे अंतर्गत वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या,बिबीका मकबरा , देवगिरी किल्ला, पवनचक्की यांच्यी माहिती घेतली व प्रेक्षणिय स्थळे पाहून गहिवरून गेले या वेळी औरंगाबाद परिसरातील जागृत देवस्थान भद्रा मारुती, यांच्ये दर्शन ही करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांचा उत्साह व आंंनद व्दिगुणीत झाला होता.

