
नविन नांदेड। नांदेड जिल्हयांचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सुचनेनुसार भाजयुमो लोहा तालुका उपाध्यक्षपदी टाकळगाव येथील संरपच प्रतिनिधी भिमराव लामदाडे टाकळगावकर यांच्यी नियुक्ती ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या ऊपसिथीत लोहा भाजपा कार्यालय येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.

लोहा तालुक्यातील टाकळगाव येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व लोहा तालुका अध्यक्ष आंनदराव पाटील ढाकणीकर यांच्ये खंदे समर्थक ,टाकळगाव संरपच प्रतिनिधी भिमराव लामदाडे टाकळगावकर यांच्यी भाजयुमो लोहा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सदरील नियुक्ती पत्र भाजपा लोहा कार्यालय येथे भाजयुमो जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे,लोहा भाजपा तालुकाध्यक्ष आंनदराव शिंदे ढाकणीकर, माजी सभापती बालाजी पाटील मारतळेकर,शंकर पाटील ढगे, पंचायत समिती सदस्य गणेश उबाळे, नरेंद्र गायकवाड, तालुका अध्यक्ष लोहा बंडु पाटील वडजे, यांच्या ऊपसिथीत देण्यात आले.

निवडीबद्दल शिवाजी राव मोरे, माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके धनाजी आढाव, शिवकुमार आढाव, रंगराव लोंढे,संजय मोरे,बंडु पाटील वडगावकर, प्रभाकर थेटे, गोविंदराव मोरे, माधव लामदाडे, चक्रधर खानसोळे, गजानन भोगं,काळबा पाटील शिंदे,व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.

