
उस्माननगर, माणिक भिसे। शिक्षणापेक्षा ही , विद्वत्तेपेक्षाही व ज्ञानापेक्षाही कशाला महत्त्व आहे तर ते म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये ( व्यवहाराला ) नैतिकतेला महत्त्व असून वैद्यकीय ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी यांनी केले.

उस्माननगर ता.कंधार येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै. नागोराव गणपतराव पांडे लाटकर वैद्यकीय ट्रस्ट नांदेड व समता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी रोजी करण्यात आले होते.

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक शामसुंदरराव जहागीरदार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराव बोदेमवाड , वैद्यकीय ट्रस्ट अध्यक्ष भालचंद्र लाठकर , सत्कारमूर्ती माजी सेवानिवृत्त गटविस्तारधिकारी प.स.कंधार राजेश्वर राव पांडे लाठकर , जीवन गौरव पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक रामकिशनराव मारोतराव वारकड , मुख्याध्यापक गोविंदराव बोदेमवाड, श्रीमती पांडे ,सौ.वारकड ,यांची उपस्थिती होती.

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , कै. सौ.शैलजा भालचंद्र लाठकर ,कै.नागोराव गणपतराव पांडे लाठकर,कै.आनंदीबाई नागोराव पांडे-लाठकर ,कै.भास्कर नागोराव पांडे-लाठकर यांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन करण्यात आले.उपस्थित कार्यक्रमांचे अध्यक्ष व उपस्थित पाहुण्याचा स्वागत सत्कार करण्यात आला.त्यानंतर दि.२ जानेवारी रोजी समता विद्यालयाच्या प्रांगणात गावातील शाळेतील विद्यार्थ्यांची कै.सौ.शैलजा भालचंद्र लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये पाचवी ते सातवी,आठवी ते दहावी व अकरावी ते बारावी असे तीन गटाची विभागणी करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये गावातील सम्राट अशोक प्राथमिक शाळा,जि.प.के.प्रा. व जि प.प्रा.कन्या शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये अनुक्रमे क्रमांक काढून ३ जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील सोहम माधवराव सोनटक्के,रूद्रेश्वर गवळी , समता माध्यमिक विद्यालयातील सानिका रविराज लोखंडे, यांच्या सह अनेक स्पर्धक विद्यार्थ्यांना यथोचित सन्मानचिन्ह,प्रशस्तपत्र देऊन गौरविण्यात आले.

कै.नागोराव गणपतराव पांडे लाठकर,व कै. आनंदीबाई नागोराव पांडे-लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजू गोरगरिब व रूग्णांना मागील अनेक वर्षांपासून आर्थीक सहायक पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.नुकतेच उस्माननगर येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी राजेश्वर वसंत पांडे लाठकर यांचा वैद्यकीय ट्रस्ट नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र,आहेर रुपी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. आणि कै.भास्कर नागोराव पांडे-लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार २०२२ या वर्षाचा जीवन गौरव पुरस्कार येथील वीरशैव समाजातील ज्येष्ठ नागरिक तथा मुख्याध्यापक रामकिशन मारोतराव वारकड व सौ.यांचा सहपत्नीक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, आहेर देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अध्यक्षयी भाषाणात मा.मु.अ.जहागिरदार गुरुजी पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी भजन आणि भोजन करू नये ,कारण शिक्षणाचा पाया घसरू शकतो.त्यासाठी भोजनाच्या वेळी भोजन करावे ,व भजन ( अभ्यस) च्या वेळी भजन करावे.समाजसाठी समाज उपयोगी उपक्रमाची अत्यंत आवश्यकता असते.या आवश्यकतेप्रमाणे त्यांची पूर्ती करण्यासाठी ही ( संस्था ) ट्रस्ट पुढे येवून काम सेवा करित आहे.हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आज प्रवृत्ती व निवृत्ती या दोघांचा सत्कार करीत आहोत.जीवन कसे असले पाहिजे हे वारकड रामच्या प्रवृत्तीमधून दाखवून दिली आहे.

याप्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सरपंच प्रतिनिधी तथा माजी पं.स.सदस्य व्यंकटराव पाटील घोरबांड,माजी सरपंच,चेअरमन तुकाराम वारकड गुरुजी, कमलाकर देशपांडे ,काळे , देविदास डांगे, गणेश लोखंडे, माणिक भिसे, सोपान उबाळे कृषीसह्यायक , राजीव आंबेकर, यांच्यासह शाळेतील सहशिक्षक,प्राध्यपक, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ. अरविंद कुलकर्णी व पर्यवेक्षक राजीव आंबेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम पवार, मारोती गोरे ,शिवहार डांगे, धनंजय वारकड अनेकांनी परिश्रम घेतले.
