Wednesday, March 29, 2023
Home किनवट वक्तृत्व स्पर्धेने घडवून आणलेली माझी दिल्लीची वारी भाग १ -NNL

वक्तृत्व स्पर्धेने घडवून आणलेली माझी दिल्लीची वारी भाग १ -NNL

by nandednewslive
0 comment

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना दिल्लीची वारी घडवून आनली. या पाच दिवसाच्या दिल्ली वारीत आयुष्यातील सर्वोच्च असाआनंद मिळाला. परंतु स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच रोज दिल्लीची स्वप्न पडत होती. त्यामुळेदिल्लीतील पाच दिवसांचा प्रवास वर्णन लिहण्या अगोदर किनवट सारख्या भागात खासदारहेमंत पाटील यांच्या वाढदिसाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या वक्तृत्व स्पर्धेतसहभागी होण्यपूर्वी माझ्या मनाची चलबिचल कशी होती. हे व्यक्त केल्याशिवाय प्रवासवर्णन लिहणे अपूर्ण आहे असे वाटते.     

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे सन्माननीय खासदारहेमंतभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रत्येक विधानसभा मतदार संघातवक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम तीनविजेत्या स्पर्धकांना दिल्लीचे राष्ट्रपती भवना सोबतच संसद भवन, पंतप्रधान वस्तूसंग्राहलय, लाल किल्ला, गेटवे आ꙾फ इंडिया अभ्यास दौऱ्याची संधी होती आणि ही चालुन आलेली संधी मलासोडायची नव्हती. कारण आयुष्यात अशा पद्धतीची संधी मिळेल असे कधीच वाटले नव्हते.त्यामुळे कधी एकदा किनवटला वक्तृत्व स्पर्धा होईल असे वाटत होते.

स्पर्धाजिंकण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली होती आणि ज्या दिवसाची ज्या क्षणाची वाटतबघत होते. तो क्षण तो दिवस एकदाचा ऊजाडला, वक्तृत्व स्पर्धेत एक एक स्पर्धक अगदीप्रमाणिकपणे आपला विषय मांडत होते. माईकवरून माझा कोड क्रमांकाची सूचना मिळाली.मोठ्या आत्मविश्वासाने आपला विषय अगदी मोचक्या शब्दात आणि नेमके पणाने मुद्देसुदमांडणी करुन अगदी प्रामाणिकपणे विषयाला न्याय देण्याचा प्रयतेन केला होता. आताप्रतिक्षा होती ती निकालाची आणि शेवटी परिक्षकांनी निकालाची यादी वाचायला सुरुवातकेली आणि अपेक्षे प्रमाणे मी देखील विजेती ठरले.

तेव्हा खऱ्या अर्थाने वाटले “अब दिल्ली दूर नही” स्पर्धेचा निकाल हाती आल्यापासूनचदिल्लीला जाण्याची तयारी सुरु झाली होती. खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या जनसंपर्ककार्यालयातुन फोन आला रेल्वेचे तिकिट झाली होती. शनिवारी (दि.२५) डिसेंबरला नांदेडच्याहुजूरसाहेब रेल्वे स्थानकावरुन सचखंड रेल्वेने सकाळी दिल्लीकडे निघायचे होते. आणितो क्षण माझ्या जिवनातला अविश्वसनीय आणि अविस्मरणीय क्षण होता. खासदार हेमंतभाऊ पाटीलआणि राजश्रीताई पाटील आम्हाला शुभेच्छा अशिर्वाद देण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेहोते. आमच्या प्रवासासाठी सुरुवात झाली.

दिल्लीत पोहोचल्यानंतर आमच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था वेस्टन कोर्टमध्ये करण्यात आली होती. तिथेफ्रेश झाल्या नंतर आम्ही सर्वजन महाराष्ट्रसदनला पहचलो. तिथे आयएएस दर्जाचे अधिकारी ‘आम्हा सर्वांना विविधविषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन करणार होते. त्यांतील “लोकशाही दिल्लीच्या दुर्बीनीतून” दिलेले मार्गदर्शनपर व्याख्यान खरोखरचप्रेरणादाई होते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारे होते. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, संसदभवन यांना भेट देवून आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालतो कायद आणि अधिकार यांची खोलवर माहितीघेतली. वास्तु आम्ही नागरीक शास्त्राच्या पुस्तक पाहिल्या होत्या त्या आम्हालाप्रत्यक्ष पाहायल आणि अनुभवायला मिळाले.

दिल्लीतील आकर्षणाचे केंद्रबिंदु असलेले याप्रेक्षणीय स्थळाला भेट दिली. त्यानंतर खा. हेमंतभाऊ पाटील आणि पत्रकारांशी थेटसंवाद साधला झाला. नंतर आम्ही प्रधानमंत्री संग्रहालय, राष्ट्रीयसंग्रहालय, राष्ट्रीय विज्ञानकेंद्र आणि जगातील सर्वात मोटहिंदू मंदिर अक्षरधाम येथे भेट दिली आणि या दरम्यान खासदार हेमंत पाटील यांनी आम्हाला भारतीय खाद्यसंस्कृतीची अस्सल मेजवाणीदिली.  वेगवेगळ्या राज्यातील जेवणाचाआस्वाद घेतला या प्रमाणे हा फारच प्रेरणादायी ठरला “दिल्ली दौरा माझ्यासाठी गल्लीतून,दिल्ली जाण्याचे स्वप्न अनेकजण पाहातात. पण गलिहुन दिल्लीला मीखरोखरच फक्त एका स्पर्धेच्या माध्यमातून आले आणि ते फक्त खा हेमंतभाऊ पाटिल आणि राजश्रीताई पाटील यांच्यामुळे, त्यांनी गुणवंताना सम्मान देवून माझ्यासारख्या अनेक ग्रामीण भागातील तरुणांना प्रोत्साहन दिले. त्याबद्दल मी त्यांचीआजन्म ऋणी राहील. शेवटी त्यांच्यासाठी एवढेच सांगू इच्छिते, देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे। घेताघेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.

…..कु. महेक कय्युम शेख, रा. दहेली ता किनवट जि.नांदेड वर्ग 11 वी विज्ञान स्व. संगीता देवी उच्च माध्यमिक आश्रम शाळा दहेली (तांडा)

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!