Friday, March 31, 2023
Home Uncategorized अर्धापूरात अतिक्रमण धारकांचा नगरपंचायत ने दिलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ धडक मोर्चा…NNL

अर्धापूरात अतिक्रमण धारकांचा नगरपंचायत ने दिलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ धडक मोर्चा…NNL

अतिक्रमण नियमित करण्याची मागणी

by nandednewslive
0 comment

अर्धापूर, निळकंठ मदने| शहरात मागील ४० ते ५० वर्षापासून अनेक नागरीक शासकीय गायरान जमीनीवर वास्तव्य करून आहेत. अशा वास्तव्य करून असलेल्या अतिक्रमण धारकांना महसुल विभाग, नगरपंचायत मार्फत नोटीस बजावून १० दिवसाच्या आत जागा रिकामी करण्याच्या नोटीस देण्यात आल्या.

शहरातील अतिक्रमण धारकांच्या वस्तीत अत्यंत गरीब लोक, मजुरदार वर्ग, कामगार वर्ग, निराधार महीला हे मागील अनेक वर्षापासुन वास्तव्य करून राहतात. अशा निवासी लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यांना नोटीसी देण्यात आल्या त्या पैकी अनेकांना सनदी वाटप करून शासनाने १९७८ पासुन घरकुल दिलेले आहे. अशा घरकुल लाभार्थ्यांनासुध्दा नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. जे अन्यायकारक आहे.

शहरामध्ये शासनाचे अंदाजे ७०० ते ८०० एक्कर गायरान जमीन असुन त्यापैकी १० ते १५ एक्कर गायरान जमिनीवर वास्तव्य करून असणारे लोक आहेत. परंतु उर्वरीत गायरान जमिनीवर अनेक अतिक्रमणधारकांनी ताबा मिळवून सदर गायरान जमिनीच्या माध्यमातून लाखो रूपयाचे उत्पन्न काढीत असुन अशा लोकांना नोटीसी बजावण्यात आलेला नाहीत.

निवासी अतिक्रमणधारकांना जाणून बुजून नोटीस बजावुन जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. या अन्यायकारक अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वंचीत बहुजन आघाडी तालुका अर्धापूर व शहर कार्यकारणीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. अतिक्रमणधारकांना तात्कालीन ग्रामपंचायत ने सन २००८ ते १० पर्यंत अतिक्रमण जागेचा ताबा २१५० रु.ची सामान्य कर पावती दिलेली आहे.

प्रशासनाने शहरातील गरीब, मजुरदार वर्ग, कामगार, निराधार महीला सर्व गरीब लोकांच्या भावना, अडचणी लक्षात घेऊन त्याचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी मदत करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार अर्धापूर यांना देण्यात आले.या निवेदनावर वंचितचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद, सामाजिक कार्यकर्ते संघरत्न खंदारे, तालुकाध्यक्ष विनय मोरे,गोविंद दळवी, के.के. कांबळे,शेख अलीम, विलास गोलेरे, शेख शाकीर,अब्दुल शकील, सतीश ढवळे, गोपाळ शितळे, डॉ. सिद्धार्थ भेदे, सखाराम सरोदे, जिल्हाध्यक्ष निरंजना आवटे, सुनील सोनसळे, दीपक मगर, संदेश खंदारे यांच्यासह महिला व नागरिकांची मोठा संख्येने उपस्थिती होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!