नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नांदेड केंद्रावर कुसुम सभागृह येथे उद्या दि ५ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान सकाळी ११:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. या स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण ९ बाल नाट्य प्रयोग सादर होणार आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी दु. १२:३० वा. राजाराम काकांनी सहकार विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज, धर्माबादच्या वतीने नाथा चितळे लिखित, श्रीनिवास दर्शन दिग्दर्शित “पिकवलेली फळे” या नाट्य प्रयोगाने स्पर्धेची सुरवात होणार आहे तर, दु. २ :०० वा. प्रियदर्शिनी विद्या संकुल, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, भीमाशंकर दिग्दर्शित “मिसिंग” , दु. ३ :३० वा. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, नांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित,राहुल जोंधळे दिग्दर्शित “पडसाद”, सां.५:०० वा.
नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, दिग्दर्शित “सक्सेस अॅप”, या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. तर स्पर्धेच्या दुसर्या दिवशी दि. ६ जानेवारी रोजी स. ११ :३० वा. जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय मानवतच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, राजू वाघ दिग्दर्शित “काहीतरी चुकतंय वाटत”, दु. १:०० वा. गोपाला फाऊंडेशन परभणीच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, रवी पाठक दिग्दर्शित “जाईच्या कळ्या”, दु. 2:३० वा. ज्ञान भारती विद्या मंदिर,
नांदेडच्या वतीने दीपक सोनकांबळे लिखित, राधा पवार दिग्दर्शित “आस” दु. ४:०० वा. केंब्रिज माध्यमिक विद्यालय, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित “चिऊताई माझ्याशी बोल ना” सां. ५:३० वा. बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, मनीषा उमरीकर दिग्दर्शित “लक्षप्रश्न” या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. तरी सर्व रसिक, बाल प्रेक्षकांनी नाट्य प्रयोग पाहण्यासाठी जास्तीत जास्त संखेने उपस्तीत राहावे अशी विनंती स्पर्धा समन्वयक दिनेश कवडे यांनी केली आहे.