
उस्माननगर, माणिक भिसे। उस्मानगर येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया दि २९ डिसेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे दि ४ जानेवारी २०२२ रोजी नामांकन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती या सोसायटीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी ४९ उमेदवारांनी आपले नामांकन पत्र दाखल करण्यात आले आहे. आज गुरुवार दि ५ जानेवारी रोजी नामांकन पत्र छाननी होणार आहे.

तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या उस्मानगर सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत येणाऱ्या उस्मानगर , तेलंगवाडी , कांजाळा, कांजळा तांडा कांजाळवाडी साठी ४९ उमेदवारांनी आपले नामांकन पत्र दाखल केले आहे.या निवडणुकीसाठी दि २ फेब्रुवारी रोजी जि प प्राथमिक शाळा उस्मानगर येथे मतदान प्रक्रिया होणार आहे.

१०२९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील,त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे माहीत देण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती एस डी जाधव लिपिक, साह्यक निबंधक कार्यालय कंधार यांच्या अधिपत्याखाली पुर्ण होणार असल्याचे माहिती देण्यात आली आहे.

