नांदेड| प्रख्यात स्वातंत्र्यता सेनानी स्वामी रामानंद तिर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थाचालक तसेच अंतर्गत शाळा, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी दि.7 जानेवारीपासून क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मागील दोन वर्षांपासून संस्था अंतर्गत असलेल्या सायन्स कॉलेज, पिपल्स कॉलेज, पिपल्स हायस्कूल मधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
यावर्षी दर शनिवार, रविवार म्हणजे दि.7 जानेवारी, 8 जानेवारी व 14 व 15 जानेवारी रोजी सायन्स महाविद्यालयाच्या क्रिडांगणात क्रिकेट, बॅटमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, चेस, शंभर मीटर धावणे, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, व्हॉलीबॉल आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच संस्थाचालकांची टीमही पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. या क्रिडा महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेड एज्युकेशन सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे.