
मुंबई। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराची आज येथे घोषणा करण्यात आली आहे.. लवकरच चाकूर येथे होणारया दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे..

राज्याच्या विविध भागातील पत्रकार संघ विविध उपक्रम राबवून, सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत असतात.. अशा तालुका संघांच्या कार्याचं कौतूक करण्याची परंपरा परिषदेनं गेली सहा वर्षे सुरू केली आहे.. राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुरस्कार वितरण सोहळे आयोजित केले जातात.. २०२२ चे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार चाकूर येथे होणार आहेत.. तारखेची लवकरच घोषणा करण्यात येईल असे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले..
प्रत्येक महसूल विभागातून एका आदर्श तालुका पत्रकार संघला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलं जातं.. स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यंदाचे पुरस्कार पुढील प्रमाणे
नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा
अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती
लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली*
नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव
पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे
कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली

औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद
कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड
पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श तालुका पत्रकार संघाचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी अभिनंदन केले आहे..

