
हिमायतनगर। आगामी काळात होऊ घातलेल्या हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक संदर्भात भाजपा शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकारी यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत निवडणूक संदर्भात सखोल चर्चा झाली. यामुळे होणाऱ्या निवडणूकित शिवसेना, काँगेस, भाजप-शिंदे गटात सामना रंगणार असल्याचे दिसते आहे.


येणाऱ्या सन 2023 च्या कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगरच्या निवडणुक संदर्भात नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या सूचनेवरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर हादगाव /हिमायतनगरचे लोकप्रिय नेते बाबुराव कदम कोहळीकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.


या बैठकीत भाजपा तालुका अध्यक्ष आशिष सकवान, सुधाकर पाटील सोनारीकर, किसनराव पाटील वानखेडे, विजय वळसे, राजु पाटील भोयर शेलोडकर, राजू पाटील पिंपरीकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, गजानन हडपकर, यासह भाजपा शिंदे गटातील सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीमध्ये येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकमध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट यांचे जास्तीत जास्त संचालक निवडून कसे आणता येतील या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील अनेक गावांमधील सोसायटीचे चेअरमन, संचालक, ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यासह आजी-माजी चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
