
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। कोलंबी ऊपसा जल सिंचन योजनेस वर्षे – 2009-2010 या वर्षामध्ये सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली असून. या प्रकल्पाचा अंदाजित किंमत (सुधारीत ) 138 कोटी असून. तत्कालीन आमदार वसंतराव चव्हाण यांनी 2017-18, 2018-19 या आर्थीक वर्षात जवळपास 83 कोटी रुपये निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती.


तेंव्हा पासून बळेगांव पंप हाऊस, उधरण नलीका, पाईपलाईनद्वारे, वितरण व्यवस्था इत्यादी कामांना सुरुवात झाली. योजना कार्यान्वीत होण्याचा कालावधी जून 2020 पर्यत असतांना -2023 ऊजाडले पण ही योजना अजून संपूर्ण कार्यान्वीत होऊ शकली नाही.


या बाबत संबधीत, कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिक्षेत असून. 4 हजार हेक्टर लाभक्षेत्र या योजने पासून वंचीत आहे. ट्रायल बेसवर 2 रोटेशन कांही भागात दिले असले तरीही अनेक गावे या रोटेशन पासून दुरच आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी कामे खोळबंली आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी सु-संवाद घडवून आनणे महत्वाचे आहे. तरच योजना पूर्ण होण्यास मदत होईल.


यासाठी मी सूध्दा प्रशासन आणि संबधीत शेतकरी यांचा संवाद घडवून आणण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. अगोदरच 2 वर्षे ऊशीराने पुढे जात असलेली कोलंबी ऊपसासिंचन ही योजना लवकरात लवकर पूर्णपणे कार्यान्वीत होऊन शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी ऊपलब्ध् करुन दिले पाहीजे हीच शेतकऱ्यांच्या हितासाठी मागणी आहे.
