
नांदेड| कंधार तालुक्यातील भीमगड कंधार येथील ग्रामीण डाक जीवन विमाधारक झगडे यांच्या वारसाला 5 लाख 24 हजार रुपयाचा विमा घेतल्यानंतर ७ महिन्याला त्यांचा निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना धनादेश वितरीत करण्यात आला.

कंधार तालुक्यातील भीमगड कंधार येथील ग्रामीण डाक जीवन विमाधारक राहुल आत्माराम झगडे (वय 35 वर्षे) यांचे हृदय विकाराच्या आजाराने दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी निधन झाले. त्यांनी 2 हजार रुपये प्रती महिना याप्रमाणे 5 लाख रुपयाचा ग्रामीण डाक जीवन विमा दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी घेतला होता. हा विमा घेऊन त्यांना केवळ 7 महिने झाले होते.

त्यांच्या या निधनानंतर डाक विभागामार्फत त्यांच्या वारस पत्नी श्रीमती शिल्पा राहुल झगडे यांना 5 लाख 24 हजार रुपयाचा धनादेश डाकघर अधीक्षक राजीव पालेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण डाक जीवन विमा वरदान ठरत असून प्रत्येकांनी आपली बचत व संरक्षण म्हणून ग्रामीण डाक जीवन विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे डाकघर अधिक्षक राजीव पालेकर यांनी केले आहे.

