
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे बेताल वक्तव्य करणारे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात नरसी चौकात आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आदोलन करण्यात आले.

या आदोलनात भाजपा जिल्हासरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर, भाजपा ओबीसीं मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, गंगाजी पाटील मुगावकर अँड. ज्ञानेश्वर मोरे आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी धर्मवीर संभाजी महाराज हे मोगलांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार करा म्हणून बंदिस्त केले होते पण मी हिंदु आहे हिंदूच राहील.

हिदू रक्षणासाठी माझा प्राण गेला तरी बैहतर पण धर्म बदलणार नाही. असे हिंदूचे संरक्षण करणाऱ्या राज्याचा शिरछेद मोगलानी केला तरी धर्म सोडला नाही. अश्या राजा बदल अजित पवारांनी मतासाठी आपल्या अकलेचे तारे तोडून संभाजी राजे धर्मवीर मनता येणार नाही. असे व्यक्तव्य करून महान राजाचा अवमान केला. याबद्दल अजित पवार याच्या प्रतिमेला जोडे मारून तिव्र निषेध केला. यावेळी शिवराज पाटील होटाळकर, माणिकराव लोहगावे, गंगाजी पाटील मुगावकर,ज्ञानेश्वर मोरे आदीनी तिव्र शब्दात निषेध नोंदवला.

या आदोलनात सरपंच गणेश पवार, सरपंच, पिराजी देशमुख, संभाजी पवार,मा. उपसरपंच पवार,उपसरपंच गणेश भद्रे,गोविंद कदम, सरपंच तिरूपती डाकोरे, साहेबराव पाटील, माधवराव वडजे, श्यामसुंदर कोकणे, शिवाजी चिंतले टाकळीकर, अंकुश खनपटे, आनंद बन महाराज, कोतेवार, शेख जब्बार, शिवाजी कुंचेलीकर, वाघमारे गजानन, विजय पाटील, वैभव पाटील, सोमनाथ पाटील,भगवान पाटील,तिरूपती मोरे, नवनाथ गायकवाड, गणेश कुऱ्हाडे, शंकर मोरे, संभाजी मोरे आदी उपस्थित होते.

