
नांदेड| गाडी क्रमांक 07651/07652 जालना – छपरा- जालना साप्ताहिक विशेष गाडी आणि गाडी क्रमांक 07413/07414 जालना-तिरुपती-जालना विशेष गाडीला मुदत वाढ देण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे :

गाडी क्रमांक 07413/07414 जालना-तिरुपती-जालना विशेष गाडी: गाडी क्रमांक 07414 जालना ते तिरुपती हि विशेष गाडी जालना रेल्वे स्थानकावरून दिनांक 08 जानेवारी ते 05 फेब्रुवारी, 2023 दरम्यान दर रविवारी सुटेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07413 तिरुपती ते जालना विशेष गाडी दिनांक 03 जानेवारी ते 31 जानेवारी, 2023 दरम्यान दर मंगळवारी तिरुपती येथून सुटेल.

गाडी क्रमांक 07651/07652 जालना-छपरा-जालना साप्ताहिक विशेष गाडी: गाडी क्रमांक 07651 जालना ते छपरा विशेष गाडी जालना येथून दिनांक 04 जानेवारी, 2023 ते 01 फेब्रुवारी, 2023 दरम्यान दर बुधवारी सुटेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07652 छपरा ते जालना हि विशेष गाडी छपरा येथून दिनांक 06 जानेवारी ते 03 फेब्रुवारी, 2023 दरम्यान दर शुक्रवारी सुटेल.

