नविन नांदेड। श्री गौतमेश्वर महादेव मंदिर गोदावरी काठी तारातिर्थ धनेगाव ता.जि नांदेड येथील गोदावरी नदीच्या पूरामुळे पूल पडलेला असुन रस्ता बंद असल्यामुळे लवकरात लवकर दुरूस्त करावा आशी मागणी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबरडे व जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या कडे माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब महाराज यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात मौजे धनेगांव ता.जि.नांदेड गोदावरी काठील आतीप्राचीन श्री गौतमेश्वर महादेव मंदिर तारातिर्थ (प्रर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्र) आहे. तरी या ठिकाणी दररोज भावीक भक्त दर्शनासाठी येत असतात परंतु गोदावरीच्या पूरामुळे व अतिवृष्टिच्या पाण्यामुळे पूल पुर्णतः पडलेला असल्यामुळे मंदीरावर जाण्यासाठी कसल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने दैनंदिन भाविक भक्तांच्यी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
जानेवारी महिन्यात यात्रा महोत्सव असल्याने तात्काळ पूल दुरूस्ती किंवा नवीन करून द्यावा आशी विनंती प्रत्यक्ष भेटून आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे, या निवदेनाचा प्रति जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आल्या आहेत.