
नांदेड| आधारभुत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान / भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान / भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरु आहे. या ऑनलाईन नोंदणीला शनिवार 7 जानेवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

या नोंदणीसाठी चालु हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सात / बारा, बँक खात्याची साक्षांकित प्रत, आधार कार्डची प्रत तसेच शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी माहिती कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून पोर्टलवर ऑनलाईन दरम्यानचा लाइव्ह छायाचित्र अपलोड करावयाचे आहे. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

