
नांदेड| भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मविर नव्हते असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ वर्कशॉप कॉर्नर येथे जिल्हाध्यक्ष महानगर प्रवीण साले त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महानगर संजय पाटील घोगरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष महानगर सौ. वैशाली देशमुख, वैद्यकीय आघाडी महानगर संयोजक डॉ. सचिन पाटील उमरेकर, विजय गंभीरे, अरविंद भरतीया, व्यंकट मोकले, सुशील चव्हाण, संजय अंबोरे, अशोक पाटील धनेगावकर, व्यंकटेश जिंदम, बाबुराव शिंदे कासारखेडकर, साहेबराव गायकवाड, अनील हजारी, बालाजी सूर्यवंशी, कामाजी कदम, तालुकाध्यक्ष संतोष शिरसागर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद पावडे, संतोष भोसले, मारुती वाघ, संदीप पाटील भालेराव, संदीप पावडे, राज यादव अक्षय अमीलकंटवार, विशाल शुक्ला, महिला मोर्चाच्या डॉ. शितल भालके, शतकारका पांढरे, महादेवी मठपती, कंचन ठाकूर आदी उपस्थित होते.

