
नायगांव। नैतिकतेचा -हास होत चाललेल्या जिवन शैलीला आधार देण्याचे काम केवळ धार्मिक कार्यच करू शकतात, चांगल्या पेक्षा वाईटाचा प्रभाव जास्त असतो ,परंतु एखादा सज्जन व्यक्ती हजारे केलेल्या वाईट कामांना आपल्या विचार व कार्यातून संपवितो त्यालाच संत म्हणतात असे शिवकीर्तनकार शिवराज गुरूजी नावंंदे यांनी शिवनाम सप्ताह सांगता प्रसंगी विचार व्यक्त केले.

रातोळी ता.नायगाव येथील मनार नदीच्या काठावर पुरातन असलेल्या इच्छापूर्ती महादेव मंदिरात सातवा अखंड शिवनाम सप्ताह संपन्न झाला. यावेळी प्रसादाची कीर्तन सेवा महाराष्ट्र राज्य शिव सांप्रदायीक कीर्तनकार मंडळाचे अध्यक्ष शिवराज गुरूजी नावंंदे यांची पार पडली. राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी केलेल्या कार्याचा दाखला या निमित्ताने दिला. या वेळी गुरूवर्य ष.ब्र.शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांचे प्रवचन झाले.

ते म्हणाले दान हे सर्व श्रेष्ठ कार्य आहे, ते तुम्ही द्या तुम्हाला त्याचं अनुभव येईल योग्य वेळी योग्य ठीकाणी दान केल्याने आपली इच्छा पुर्ती झाल्या शिवाय राहणार नाही असे प्रवचन सेवेतून अमृत उपदेश केला. यावेळी या गावचे भूमीपुत्र आ.राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते गुरूवर्यचा सत्कार करण्यात आला.तर महादेव मंदिरासाठी जागा दान दिल्या बद्दल माजी पंचायत समिती सदस्य शिवराज पाटील रातोळीकर यांचा सत्कार करण्यात आला व मंदिर उभारणी साठी योगदान दिलेल्या भक्तांचा गौरव गुरूवर्याच्या अमृतवाणीतून करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव लंगडापुरे, शिवकीर्तनकार विश्वाभंर महाराज बडुरे, विकास भुरे, बालाजी महाराज कोळगावकर, व्यंकटराव तांबोळी, मारोती पांचाळ, अशोक पाटील उच्चेकर,कालीदास कीडे, शिवसांब स्वामी ,राजेश्वर महाराज कोंडलवाडीकर, हणमंत तांबोळी, शिवराज पाटील साखरे, लक्ष्मीबाई लिंबुर, कौशल्य मलकापूर, गणेश थोटे, यांच्या सह सलगरा, कर्णा,चांडोळा,नंदगाव रातोळी येथील भजनी मंडळ गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

