
माहूर, राज ठाकूर| नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथील सामाजिक कार्यकर्ते मदन वसंता राठोड यांना महात्मा कबीर समता परिषदेच्यावतीने दिला जाणारा सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

महात्मा कबीर समता परिषदेच्यावतीने दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी शंकरराव चव्हाण सभागृह येथे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मदन वसंता राठोड यांनी माहूर या आदिवासी तालुक्यात केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना महात्मा कबीर समता परिषदेच्यावतीने सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार ऍड. मुकूंदराज पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी बहुजन समाज पार्टीचे मनीष कावळे, समाजसेविका जयश्री जयस्वाल, गोदातीर समाचारचे संपादक पंढरीनाथ बोकारे, लवकुश जाधव, वर्षा चव्हाण, नागनाथ माधापूरे आदींची उपस्थिती होती.

मदन राठोड यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. शितल वातीले, प्राचार्य एच.एम. बारडकर, एचओडी बारबुधे, विनोद ठाकरे, दुधे, नानुरे, धनश्री पोहरे, काळे, निलेश राठोड, तुषार राठोड आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

