भोकर, गंगाधर पडवळे| म. रा.वि. वि. कंपनी कडे तालुक्यातील मालदरी तांडा येथील १०शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील कृषीपंपा साठी लागणारी वीज कनेक्शन मिळावे यासाठी रीतसर अर्ज व कोटेशन भरून दोन वर्ष लोटून आजपर्यंत वीज कनेक्शन मिळाले नाही परिणामी शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची वरचेवर आर्थिक परिस्थिती खालावत चालल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी दहा शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसह आत्महत्या करीत असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.
तालुक्यातील मालदरी तांडा येथील शेतकरी नामे १)अमोल भगवान कदम २)संतोष किशन जाधव ३)शेषराव बळीराम जाधव ४)हाणमल्लू नरसीमलू कडकुठवाड ५)महालनबाई यमजी राठोड ६)राजेश वामन आडे ७)लक्ष्मण घमना कडकुठवाड ८)अंकुश रामसिंग आडे ९) प्रेमालाबाई राजू जाधव १०) रत्नमाला विलास आडे यांनी हे आपली उपजीविका शेतीवर कष्ट करून भागवितात. सध्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणा मुळे खरीपाची पिके कधी अतिवृष्टीने तर कधी कोरड्या दुष्काळाने सतत नापिकी होत आसल्याने सदरील कुटुंबंयांची पूर्ण मजाल रब्बी पिकांवर अवलंबून आहे.
ह्या कुटुंबियांनी शासकीय योजनेतून जलसिंचनाची व्यवस्था केल्याने व पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने प्रामुख्याने हळद,गहू,हरभरा, ज्वारी, लसूण. मिर्ची घेता येतील? त्याकरिता दि.१४ सप्टेंबर २०२०रोजी कृषी पंपा साठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय भोकर यांच्याकडे रीतसर अर्जा सह कोटेशन भरले असून दोनवर्षं उलटून गेले असून अद्याप त्यांना विज कनेक्शन व डी. पी. मिळाला नसल्याने रब्बीचे पिके हे हातचे जातं असल्याने यापूर्वी संबंधित कंपनीला अनेकवेळा तोंडी, लेखी सांगून सुद्धा काहीच फरक पडला नाही.
त्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह, आपल्या पाल्ल्याचं शिक्षण, आरोग्य, घरातील उपवर मुला,मुलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत असल्यामुळे वरिल कुटुंबिय हे हतबल झाल्याने दि.२५ जानेवारी २०२३पर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दि.२६ जानेवारी २०२३(प्रजासत्ताक दिनी) तहसील कार्यालय भोकर समोर कुटुंबिया सह सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे एका निवेदना द्वारे कळविले आहे. सदरील निवेदन जिल्हाधिकारी नांदेड, तहसील कार्यालय भोकर, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय नांदेड, महाराष्ट्र राज्य विद्युत विभागीय कार्यालय भोकर,ईत्यादिना देण्यात आले आहे.
आम्ही शासनाला याबाबत मागणी केली असून येत्या मार्च मध्ये बजेट येणार आहे. १एप्रिल २०१८ नंतर चे कोणतेच काम मंजूर झाले नाही बजेट आल्यावर प्रधान्याने मालदरी येथील शेतकऱ्यांचे काम करू तरी त्यांना विनंती आहे की आपण आत्महत्या सारखे असे कोणतेही पाऊल उचलू नये या करिता आम्ही स्वतः जाऊन त्यांचे समाधान करून समजवून सांगू. असे नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना Dy शेख भोकर उपविभाग म. रा.वि. वि.कं. यांनी सांगितले.