
नांदेड| रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने भोकर येथे रस्ता सुरक्षा हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश डी.डी. माने यांनी रस्ता सुरक्षा व हेल्मेटचे महत्व याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भोकरचे सह दिवाणी न्यायाधीश डी.डी.माने हे होते. तर या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, भोकरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रसूल तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांची उपस्थिती होती.

या हेल्मेट रॅलीमध्ये जवळपास 100 वाहन चालकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अशा प्रकारचा तालुकास्तरीय कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथमच घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण रहाणे तर आभार मोटर वाहन निरीक्षक मनोज चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन मोटार वाहन निरीक्षक मनोज चव्हाण, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रवीण रहाणे व केशव जावळे यांनी केले.

