
नांदेड| स्त्री उद्धारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्यामुळेच आज सर्व क्षेत्रात महिलांचा सन्मान होत असतांना पाहायला मिळते. विद्यार्थिनींनी सावित्रीबाईं फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उच्चशिक्षित व्हावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. अरुणा नरवाडे यांनी केल्या.

दीपकनगर तरोडा बुद्रुक येथील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला व पालक मेळाव्यात त्या अध्यक्षीय समारोप करतांना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोक शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ.अरुणा नरवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समितीच्या राज्य सदस्या प्रा. डॉ.सत्यभामा जाधव, संस्थेचे सचिव के.जी. नरवाडे, श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस. एन.राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक साखरे, जेष्ठ महिला पालक श्रीमती सुमनताई भोवरे, श्रीमती शांताबाई रगडे, माध्यमिक चे मुख्याध्यापक यशवंत थोरात आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आदी महापुरुषांच्या प्रतिमेची पुष्प पूजा करून अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरुणा नरवाडे यांनी श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २६ वर्षांपूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे हे २७ वे वर्षे असून या व्याख्यानमालेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर अनेक वक्त्यांनी उपस्थिती लावून प्रकाश टाकल्यामुळे विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने सावित्रीबाईंचे योगदान किती महत्त्वाचे हे कळाले आहे. असे मुख्याध्यापिका डॉ.राऊत यांनी प्रस्ताविकेतून सांगून शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती देऊन सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. आयोजित कार्यक्रमात अनेक विद्यार्थी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील उपस्थित राहून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी विद्यार्थी यश पोहरे, पृथ्वीराज सूर्यवंशी,कु. स्वराली कोकाटे, स्नेहल पोतरे, दिशा पाईकराव, जानवी कांबळे, दिव्या पाईकराव, आराध्या रगडे, सृष्टी माघाडे,मान्यता कांबळे,संघर्ष भद्रे,समाधान पंडित,गौरव शेळके,अंजली मुळे, सुनील ढोले, गोविंद शेळके आदी विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुरेख असे बहारदार सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ.निता जगधने, सौ. कांचन घोडकेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक प्रल्हाद आयनेले यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

