Monday, February 6, 2023
Home कृषी शेतीला पूर्ण वेळ मोफत वीज द्या…अन खुशाल खासगीकरण करा -NNL

शेतीला पूर्ण वेळ मोफत वीज द्या…अन खुशाल खासगीकरण करा -NNL

वीज कर्मचाऱ्यांच्या च्या संपाबद्दल संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीची भूमिका...

by nandednewslive
0 comment

नांदेड। सध्याला राज्य सरकार महावितरण व महापारेषण या सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करत आहे. या खासकीकरणास संभाजी ब्रिगेडचा विरोधच आहे. व कर्मचाऱ्यांच्या संपाला सुद्धा आमचा पाठिंबा आहे. तरीही सरकारचे आडमुठे धोरण असेल तर शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज द्या आणि खुशाल खासगीकरण करा अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी दिली आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, आजपर्यंत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून शेतकऱ्यांचा जो छळ मांडला त्याचा विचार करता काही गोष्टी याठिकाणी स्पष्टपणे बोलणे गरजेचे वाटते. जसे एसबीआय बँकेचे खाजगीकरण होणार या बातमीने कर्मचाऱ्यांच्या मुजोरीला कंटाळलेले बँकेचे ग्राहक कर्मचाऱ्यांच्या विरोधात व खाजगीकरणाच्या बाजूने बोलू लागले. तशीच आज महावितरणच्या लोकांनी शेतकऱ्यांची सहानुभूती गमावलेली आहे.

शेतीसाठी असलेल्या डीपी वरील छोटे छोटे काम जरी करायचे असले तरी ही लोकं शेतकऱ्यांना सर्व सामान आणायला लावतात व ते बसविण्यासाठी सुद्धा पैसे मागतात. शेतीच्या बिलासंबंधी अन्न सुरक्षा आयोगाने निर्णय देऊन ही विजबिलासाठी शेतीची वीज तोडली. डीपी जळाला तर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांनी छळ मांडला. देशाला स्वस्तात अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला सवलतीत वीज देण्याच्या नावाखाली सरकारने हजारो कोटी सबसिडी देऊनही शेतकऱ्यांच्या दारात जाऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वसुली सुरू केली. म्हणून आज सर्वसामान्य शेतकरी या लोकांच्या विरोधात बोलत आहे. थोडक्यात आज महावितरणच्या लोकांनी संपूर्ण सहानुभूती गमावलेली आहे.

पण यावेळी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहीजेत. याच वेळी सरकारला कोंडीत पकडायला पाहीजेत. कारण शेतीला लागणारी वीज खाजगी लोकांच्या हातात दिली तर ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यांचे दरही परवडणारे नाही. जर सरकारला महावितरणचे खाजगीकरण करायचे असेल तर शेतीला चोवीस तास पूर्ण दाबाने वीज मोफत द्यायचे अगोदर जाहीर करावे. तरच संभाजी ब्रिगेडचा या खाजगिकरणाच्या निर्णयाला पाठिंबा असेल अन्यथा आम्ही सर्व शेतकरी मिळून वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत संपात उतरू अशी प्रतिक्रिया संतोष गव्हाणे यांनी यावेळी दिली.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!