
उस्माननगर, माणिक भिसे। स्त्रियांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या या सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असे असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे यांनी केले.

उस्माननगर येथील जिल्हा परिषद के. प्राथमिक शाळा व जि.प.प्रा.कन्या शाळेच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती ( बालीका दिन ) विविध कार्यक्रमांनी साजरी केली.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख जयवंतराव काळे, मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे , शाळेतील शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील मुलींना वेशभूषा परिधान करून समाजापुढे आदर्श दिला.

यावेळी बोलताना सौ.विद्या वांगे म्हणाल्या की ,ज्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. त्यांना शिक्षणाचे अधिकार , सामाजिक अधिकार नव्हते, समाजात त्यांना दुय्यम स्थान होते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी स्वता: च्या अंगावर दगड माती,शेण , झेलून स्त्रियांसाठी पहिली शाळा उघडून त्या स्वतः पहिल्या महिला शिक्षिका बनल्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत, प्रयत्न करून स्त्रियांसाठी शिक्षणाचे दारे उघडे केले.

त्यामुळे स्त्रियांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळत आहे. समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या अंगावर दगड माती, शेण झेलून स्त्रियांसाठी पहिली शाळा उघडून त्या स्वतः पहिल्या महिला शिक्षिका झाल्या त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करून स्त्रियांना शिक्षणाचे दालने खुली करून दिले त्यामुळे समाजात स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले आहे पुरुषाचे बरोबरीने स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. स्त्रियाना त्यांचे सर्व हक्क मिळाले. हे सर्व सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे घडले, त्यांचा कार्याचा व विचाराचा वारसा भविष्यामध्ये मुलींनी चालवावा म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांची योगदान भारतीय स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. पालकांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांची प्रगती घडून आणावी असे आव्हान सौ. विद्या वांगे यांनी केले.

स्त्रियांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शैक्षणिक कृती घडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा. शिक्षणाचा पाया रचनेचा व राष्ट्राच्या अर्थाने राष्ट्राच्या ज्ञानाई आहेत. सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकताना केंद प्रमुख जयवंतराव काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की , देशातील महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षण रुपी पंख देण्याचे पवित्र कार्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी केले.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या इतिहासावर अमिट असी छाप आहे. स्त्री रत्न म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिनदरीत शोषित महिलांसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील शिक्षणाचे दार उघडले .

त्यांनी शैक्षणिक पंक देण्याची श्रेय माता सावित्रीबाई फुले यांना जाते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्या काळातील मुली , महिला यांना चूल आणि मुल , या जोखाडाच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. त्यासाठी त्यांना आपल्याच समाजाकडून अनेक संकटांना ध्येयाने समोरी जाऊन स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्यांच्याच शिकविणीला व आदर्शांना समोर ठेवून विद्यार्थ्यांनी सामाजिक शैक्षणिक कार्यात पुढे यावे असे यावेळी स्पष्ट केले.यावेळी सहशिक्षक गौतम सोनकांबळे यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले.विद्यार्थ्यानीनी टाळ्या वाजवून दाद दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.भक्ती घोरबांड हिने केले तर आभारप्रदर्शन भावना घोरबांड हीने व्यक्त केले.यावेळी शाळेतील अनिरूद्ध सिरसाळकर, सुर्यवंशी, खान ,पांडागळे ,श्रीमती लोलगे ,श्रीमती पाटोदेकर ,सौ.देशमुख ,सौ. गाजूलवाड विद्यार्थी यांनी मार्गदर्शन केले.
