
नविन नांदेड। श्री क्षेत्र गंगासागर यात्रा सोहळ्याला धनेगाव येथुन खाजगी बसने प्रवास करणा-या भाविकांना आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हिरवी झेंडी दाखवून व प्रवास करणा-या भक्ताचे स्वागत करुन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांच्या सह संरपच व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

श्री क्षेत्र गंगासागर यात्रा सोहळा निमित्ताने ५ ते २५ जानेवारी २३ दरम्यान विविध तिर्थक्षेत्र सह अनेक प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्रांना हे जवळपास तिस तिर्थक्षेत्रांना भेटी देऊन हे भाविक दर्शन घेणार आहेत, यासाठी भागातील धनेगाव,ढाकणी,तुप्पा,बाभुळगाव,वाघाळा,झरी,राहटी,या गावातील अनेक महिला पुरुष खाजगी बसने दि.५ जुनं रोजी सकाळी अकरा वाजता धनेगाव येथील हनुमान मंदिर येथुन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली, यावेळी यात्रा सोहळ्याला जाणाऱ्या भाविकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, रावसाहेब महाराज पाटील,माजी पंचायत समिती सदस्य भुंजगराव भालके, संरपच पिंटू पाटील शिंदे, गंगाधर कवाळे, नितीन पाटील शिंदे,दिंगाबर शिंदे, चिमणाजी पाटील कदम,दता पाटील कदम,कैलास शिंदे, यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यात्रा सोहळ्याचे आयोजन धंनजय माधवराव जाधव यांनी केले असून या यात्रेत दैनंदिन काकडा,हरिपाठ ,भजन, किर्तन आयोजित केले असल्याचे सांगून विस दिवसात हि यात्रा अनेक तिर्थक्षेत्र यांना भेट देणार असल्याचे सांगितले.

