
हिमायतनगर, अनिल मादसवार| सर्वदूर ख्यातीप्राप्त असलेल्या हिमायतनगर (वाढोणा – वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या नियोजन संदर्भात दि.०५ जानेवारी गुरुवारी दुपारी यात्रा कमिटीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी भाविक भक्तनि केलेल्या बक्षीस वाढीला मान्यता देण्यात आली आहे. तर तीन वर्षाच्या कोरोनाकाळानंतर होणारी यात्रेच्या अनुषंगाने अनेक समित्यांमध्ये फेरबदल करण्यात आले असून, त्यामुळे यंदाची यात्रा हि हर्षोल्हासात साजरी होण्यासाठी युवा पिढी पुढाकार घेणार असल्याचे दिसते आहे.


सबंध विदर्भ – मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेली हिमायतनगर (वाढोण्याच्या) श्री परमेश्वराची महाशिवरात्री यात्रा उत्सव जवळ येऊन ठेपला आहे. या निमित्त यात्रेतील कार्यक्रम व नियोजन संदर्भाची दि.०५ जानेवारी रोजी बैठक मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील मंदिर सभागृहात संपन्न झाली. तीन वर्षाच्या कोरोना काळातील निर्बंधामुळे यात्रा झाली नसल्याने यंदाचा यात्रा महोत्सव अंत्यंत आनंदाने साजरी केला जाणार आहे. महाशिवरात्री यात्रेला गुरुवार दि.१६ फेब्रुवारी पासून सुरु होऊन दि.०३ मार्चला समारोप केला जाणार आहे. यात्रा महोत्सव दरम्यान भाविक – भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरूना येणाऱ्या आडी- अडचणी व नियोजन यावर सखोल चर्चा झाली. तसेच यात्रेच्या सात दिवस ज्ञानेश्वरी व वीणा पारायण सप्ताह, काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, किर्तन, प्रवचने आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यानंतरच्या काळात धार्मिक – सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आणि खास करून शंकर पाटाचे आयोजनही केले जाणार असून, बक्षिसाचे नियोज़न या बैठकीत करण्यात आले आहे.


तसेच यात्रा काळात आयोजित कार्यक्रम सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी आणि यश मिळविणाऱ्या संघ, खेळाडू, शालेय स्पर्धा, कब्बड्डी, भव्य कुस्त्यांची दंगल, भजन, पशुप्रदर्शन, शंकरपट, मनोरंजन महिलांसह विविध स्पर्धा व विद्यार्थी – विद्यार्थीनीचा बक्षिसे देऊन सन्मान – गौरव याबाबतही सखोल चर्चा झाली. मागील वर्षीच्या तुलनेत विविध स्पर्धांमध्ये देण्यात येणाऱ्या बक्षीसामध्ये वाढ करण्याची सूचना उपस्थितांनी केल्या. यावेळी यात्रा सब कमिटीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिवपदी अनिल भोरे, तर सदस्य म्हणून संतोष गाजेवार, उदय देशपांडे, मारोती शिंदे, गजानन चायल, गजानन पाळजकर, दिलीप पार्डीकर, विठ्ठल ठाकरे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुसिंग ठाकूर, गणेश शिंदे, बाबुराव होनमने, सुनील चव्हाण, अन्वर खान, दत्तात्रेय काळे, ज्ञानेश्वर पालिकोंडलवार आदींची यात्रा सब कमेटीमध्ये निवड करण्यात आली.


तसेच आयोजित विविध कार्यक्रमाच्या उपसमित्या नेमण्यात येऊन त्या स्पर्धा संपन्न करण्याची जबाबदारी संबंधित समितीच्या पदाधिकार्यांवर सोपविण्यात आली आहे. एकूणच यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुविधा व दर्शनार्थीना प्रसादाचे वितरण यासाठी विशेष व्यवस्था करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. या सर्व प्रस्तावावर पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार यांच्यासह संचालक मंडळाची बैठक घेऊन अमलात आणण्यात येतील असे ठोस आश्वासन मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिले.

यावेळी मंदिराचे सेक्रेटरी अनंता देवकते, जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, संचालक प्रकाश शिंदे, राजाराम झरेवाड, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, माधवराव पाळजकर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, अनिल मादसवार, संजय माने, गजानन मुत्तलवाड, विलास वानखेडे, लिपिक बाबुराव भोयर गुरुजी, विठ्ठलराव फुलके, भाऊराव वानखेडे, साहेबराव आष्ट्कर, राम नरवाडे, वामनराव हेंद्रे, राजू गाजेवार, संदीप तुप्तेवार, रामराव पाटील, रामभाऊ सूर्यवंशी, गजांनन हरडपकर, राम जाधव, विकास नरवाडे, ज्ञानेश्वर मादसवार, दुर्गेश मंडोजवार, पंडित ढोणे, मुन्ना शिंदे, मनोज यंगलवार, एसटी महामंडळाचे दळवी साहेब, हनुसिंघ ठाकूर, लक्ष्मण डांगे, बालाजी ढोणे, मोहन ठाकरे, काशिनाथ गड्डमवार, निक्कू ठाकूर, नागेश शिंदे, अनिल नाईक, शिवाजी रामदिनवार, विजय दळवी यांच्यासह भजनी मंडळाचे कार्यकर्ते व गावातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
