
पुणे| इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड फायनान्शियल सोल्युशन या संस्थेच्या वतीने बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी http://institutefortrainingandfinancialsolutions.co.in हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठीचे प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांची माहिती या संकेतस्थळावर दिली जाणार आहे.

या संकेतस्थळाचे लोकार्पण टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ श्री. ग. बापट यांच्या हस्ते दि ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता श्री शानू पटेल शैक्षणिक संकुल, वारजे येथे होणार आहे.बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ प्रशिक्षक श्रीधर नागनूर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. इन्स्टिट्यूट च्या वतीने निशिकांत देशपांडे आणि विनायक देशपांडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली

