
नविन नांदेड। दर्पण दिनानिमित्त सिडको परिसरातील विविध दैनिकाचे प्रतिनिधी यांच्या परिसरातील विविध संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांनी स्वागत व सत्कार करून शुभेच्छा दिल्या तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वतीने सन्मान करुन शुभेच्छा देण्यात आल्या.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दर्पण दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी परिसरातील पत्रकारांचा सिडको वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या पदाधिकारी सतिश कदम, बालाजी सुताडे,दिलीप ठाकूर व जेष्ठ विक्रेते शेख सयोधदीन मदन सिंह चौहान, दौलतराव कदम,महिला वितरक वंदना लोणे ,व पदाधिकारी यांनी सिडको सेटंर येथे सत्कार केला,तर वंचित बहुजन दक्षिण महानगर आघाडीच्या वतीने विठ्ठल गायकवाड यांनी संपर्क कार्यालय येथे लेखणी, डायरी, पुष्पहार देऊन सत्कार केला, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवि पंडित, तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, व पदाधिकारी यांनी तर भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने भाजपा नगरसेविका सौ इंदुबाई शिवाजीराव घोगरे यांच्या संपर्क कार्यालय हडको येथे शाल श्रीफळ , डायरी देऊन सन्मान केला.


यावेळी राजु पाटील घोगरे,सुनिल पाटील भालेराव,संदीप फावडे, चक्रधर कोकाटे, भाजयुमो सिडको अध्यक्ष गजानन कते, उमेश स्वामी, गोविंद मजरे ,बाळु अप्पा एकलारे,तर असरजन येथील राज्य पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी वही पेन शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, संभाजी चौक सिडको येथे युवा नेते राजू लांडगे व पंजाबराव देशमुख यांनी व नांदेड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सतिश बसवदे,बालाजी गिरे,साई पाटील, सचिन डेमरे, गजानन मोरे, रवि रायबोळे,यांनी लेखणी देऊन सन्मान केला.


यावेळी दर्पण दिनानिमित्त विविध ठिकाणी पत्रकार तुकाराम सावंत, रमेश ठाकूर,किरण देशमुख, तिरूपती पाटील घोगरे,अनिल धमणे, निळकंठ वरळे,शाम जाधव, शिवाजी राजुरकर,संग्राम मोरे,दिंगबर शिंदे, छायाचित्रकार सांरग नेरलकर, यांच्या सह विविध दैनिकांच्या पत्रकाराचा सन्मान करण्यात आला.
