Monday, March 27, 2023
Home Uncategorized दर्पण दिनी जेष्ठ संपादक .भाई डॉ केशवराव धोंडगे याना अभिवादन -NNL

दर्पण दिनी जेष्ठ संपादक .भाई डॉ केशवराव धोंडगे याना अभिवादन -NNL

by nandednewslive
0 comment

लोहा| साप्ताहिक जयक्रांतीचे संपादक मराठवाड्याचे जेष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांना दर्पण दिनी बहादरपुरा येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम तसेच लोह्याचे पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील यांचे चिरंजीव प्रा डॉ धनंजय पवार तसेच उपनगराध्यक्ष दता वाले , आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, खाप्राशा संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ चव्हाण, संजय मक्तेदार, हरिहर धुतमल यांनी भाई धोंडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भाई धोंडगे यांचे चिरंजीव ऍड मुक्तेश्वर धोंडगे, धाकटे चिरंजीव प्रा डॉ पुरूषोत्तम धोंडगे यांच्या भेट घेतली. यावेळी लोह्याचे पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार, माजी सभापती व्यंकटराव मुकदम, यशवंतराव पाटील चव्हाण यांच्या सोबतच भाई धोंडगे यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक प्रसंग ऍड मुक्तेश्वर धोंडगे तसेच प्रा पुरुषोत्तम धोंडगे यांनी यावेळी सांगितले.

मुकदम, वटटमवार, प्रा पवार यांनी धोंडगे बंधूंचे सांत्वन केले. यावेळी माजी उपसभापती मारुती पाटील बोरगावकर, माजी नगराध्यक्ष स्वप्नील पाटील लुंगारे, व्ही जी चव्हाण ,दता पाटील हळदेकर, हरी पाटील शिंदे, मधुकर वानखेडे, यासह धोंडगे परिवारातील सदस्य उपस्थित होते. दर्पण दिनाच्या निमित्ताने संपादक म्हणून भाई धोंडगे यांच्या पत्रकारितेतील अनेक प्रसंगांना उजाळा देण्यात आला त्यांना लोहा तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!