
नांदेड| येथील श्रीकर प्रकाशनने सिद्ध केलेल्या कवी दि.मा. देशमुख यांच्या ‘शब्दवेल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि.८ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त उपप्राचार्य डॉ.दीपक कासराळीकर यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच वक्ते म्हणून व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुरेश सावंत, प्रसिद्ध कवयित्री आशा पैठणे, कवियत्री सुवर्णा कळसे यांचीही उपस्थिती राहणार आहे. नवकवींच्या ‘साहित्याला ऊर्जितावस्था’ देण्याच्या श्रीकर प्रकाशनच्या या उपक्रमातील हा पाचवा कवितासंग्रह आहे.

रविवार, दि.८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. गिरीराज मंगल कार्यालयात होणार्या या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दि.मा. देशमुख, दत्ता देशमुख, वसंतराव देशमुख, भगवानराव देशमुख, हरिहर देशमुख, विकास देशपांडे, विजय दीक्षित यांच्यासह श्रीकर प्रकाशनचे गिरीश कहाळेकर यांनी केले आहे.

