Saturday, January 28, 2023
Home अर्थविश्व यावर्षी सोन्याचे दर प्रति तोळा ५८,००० रुपयांवर जाण्याचा अंदाज – एंजल वन -NNL

यावर्षी सोन्याचे दर प्रति तोळा ५८,००० रुपयांवर जाण्याचा अंदाज – एंजल वन -NNL

by nandednewslive
0 comment

मुंबई| यावर्षी सोन्याचे दर प्रति तोळा ५८,००० रुपयांवर जातील असा अंदाज एंजल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोन्याचे दर २१०० डॉलर्स प्रति औंस होण्याची शक्यता आहे. ज्यांना सोन्याच्या खरेदीतून मूल्यनिर्मिती करायची आहे त्यांच्यासाठी ४८,०००-५०,००० प्रति दहा ग्रॅम श्रेणीतील सोने खरेदी करणे व जमवून ठेवणे हा पर्याय ठरू शकतो. दरवाढीनुसार भावनेच्या भरात खरेदी करण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी धोरणीपणे प्रत्येक टप्प्यावर सोने खरेदी करून जमवून ठेवावे असा सल्ला त्यांनी गुंतवणूदारांना दिला.

गतवर्षी कमोडिटीतील मोठ्या वाढींसाठी तसेच घसरणींसाठी डॉलर केंद्रस्थानी राहिला आहे. डॉलरची ताकद व कमोडिटी यांच्यातील व्यस्त सहसंबंध हा गेल्या अनेक दशकांपासून नियम झाल्यासारखा आहे. अर्थात, दोन वर्षे सलग भक्कम राहिलेल्या अमेरिकी डॉलर निर्देशांकात (डीएक्सवाय), प्रत्यक्ष व अपेक्षित दर फरक सातत्याने वाढत असूनही, नुकतीच तीव्र घसरण झाली आहे. २०२३ मध्ये डॉलर घसरतच राहिला, तर कमकुवत डॉलर व वाढत्या कमोडिटी यांच्यातील व्यस्त सहसंबंध आपल्याला दिसून येईल आणि सोने व चांदी या सहसंबंधांचे सर्वांत मोठे लाभार्थी ठरतील असे मत श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.

एकंदर, २०२२ हे वर्ष रोलर कोस्टर राइडसारखे ठरले, नेमके काय होणार आहे याबद्दल आपल्यापैकी कोणालाच अंदाज बांधता आला नाही. मात्र, २०२३ मध्ये, प्रमुख बाजारांमध्ये मंदीची शक्यता असल्यामुळे २०२२ मधील इक्विटी व कॉर्पोरेट रोख्यांची निकृष्ट कामगिरी पुढे तशीच सुरू राहील अशी शक्यता आहे. याउलट सोने संरक्षण पुरवू शकते, कारण मंदीच्या काळात सोन्याची कामगिरी चांगली होते, गेल्या सातपैकी पाच मंदींच्या काळात सोन्याची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. म्हणूनच, २०२३ मध्ये सोने दोनअंकी मोबदला मिळवून देईल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!