
मुखेड, रणजित जामखेडकर| शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व नांदेड पतंजलि योग परिवार , जिल्हा परिषद आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात आले होते .

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , योगगुरू अनील अमृतवार , शिंदे , व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते , प्रा.डी.बी.साखरे , प्रा.डॉ. बी.एस.केंद्रे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. सी.एन.एकलारे तर आभार प्रदर्शन क्रीडा निर्देशक प्रा.डॉ. एस.बी.गायकवाड यांनी केले.

यथोचित सत्कारानंतर उपस्थित विद्यार्थी , प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक द्वारे योग विषयी माहिती दिली . भारत स्वाभिमान वर्धापन दिवस व मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष या निमित्ताने दि.१६ नोव्हेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ या ५१ दिवसात नांदेड जिल्ह्यातील १००१ शिक्षण संस्थेत हा उपक्रम राबविण्यात येत आहे . हा कार्यक्रम निशुल्क आयोजित करण्यात आला होता .

योग प्रशिक्षक अनिल अमृतवार यांनी समाजात वावरताना वाढत चाललेली विषमता , द्वेष , तिरस्कार या विषयावर चर्चा करताना उत्तम आरोग्य सांभाळून मन शांत झाले तर निश्चितच जग जिंकण्या साठीची तयारी होते. योग साधनेत सातत्य , मेहनत , चिकाटीने कार्य केल्यानंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदी आणि समाधानी होऊन जगता येतो असे विचार व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.सी.बी.साखरे यांनी योग साधना आनंदी जगण्याची कला आहे . आयुष्यातील प्रत्येक क्षण अतिशय आनंदाने व्यतीत करण्यासाठी योगाची खुप गरज आहे . स्वतःच्या आयुष्यात योगामुळे झालेले बदल , सामाजिक क्षेत्रातील कार्याला मिळणारे बळ इत्यादी विषयावर प्रकाश टाकला आहे . बहुसंख्येने विद्यार्थी – विद्यार्थिनी , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

