
नांदेड| वृत्तपत्र क्षेत्रातील पाल्य शिक्षणापासून वंचीत राहू नये आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी अडचणी निर्माण होऊ नये म्हणून अशा गरजवंताना राजस्थानी मल्टीस्टेटच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज व 11 विद्यार्थ्यांना बन्सल कोचींग क्लासेसमध्ये मोफत शिक्षण देण्याचे वचन बँकेचे संस्थापक तथा ज्येष्ठ संपादक चंदुलाल बियाणी यांनी पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात दिल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


मीमांसा फाऊंडेशन, मिडीया-पोलीस सोशल क्लब, समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारिता पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात येतो. मागील पंधरा वर्षापासून घेण्यात येणार्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला लायन्स क्लब ऑफ नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष प्रेमकुमार फेरवानी, फिजीओ केअर सेंटरचे संचालक डॉ.राजेंद्र पाटील, इतिहासाचे अभ्यासक प्रा.डॉ.साईनाथ शेटोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


यावेळी डॉ.शंकररावजी चव्हाण पत्रकारिता पुरस्कार मुंबईच्या प्रेरणा जंगम, कै.सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार परळी येथील दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, दै.महासागरचे ज्येष्ठ संपादक एम.एम.बेंद्रीकर यांना स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार तर नायगावचे सुर्यकांत सोनखेडकर स्व.अनिल कोकीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार, डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार (ग्रामीण) अर्धापूरचे रामराव भालेराव, पंचनामाकार लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार जय महाराष्ट्र लातुरचे सचिन अंकुलगे, मीमांसा फाऊंडेशन ह्युमन राईट्स पुरस्कार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे, स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार (शहर) प्रमोद योगी,


स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार (ग्रामीण) उमरीचे गोविंद ढगे, वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरात आधारस्तंभ भोकरचे बी.आर.पांचाळ, मंथन क्रिएटिव्ह डिजीटल मिडीया पुरस्कार नमस्कार महाराष्ट्रचे संघरत्न पवार, वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा (संगणक चालक) लोकमतचे पुरूषोत्तम काशटवार, स्व.माधव अंबुलगेकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार कंधारचे गणेश कुंटेवार, स्व.सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार रमेश आवटे यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. तर ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे व मारोती सवंडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण, कै.सुधाकररावजी डोईफोडे, स्व.रामेश्वरजी बियाणी व स्व.अनंतराव नागापूरकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांचे मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, सुनिल कुलकर्णी, सौ.उज्वला दर्डा, अरूणा पूरी, शिवहारी गाढे व रूपेश पाडमुख यांनी पुष्पगुच्छ, शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी मार्गदर्शन करून पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ह्यूमन राईट्सचे रामेश्वरजी धुमाळ यांनी केले तर सुरेश सुत्रसंचलन संतोष देवराये यांनी केले. शेवटी संपादक रूपेश पाडमुख यांनी आभार मानले.

मयत पत्रकार दशरथ भदरगे यांच्या कुटूंबाला शिलाई मशीनचे सहकार्य
कोरोनामुळे मयत झालेले भोकरचे पत्रकार दशरथ भदरगे यांच्या कुटूंबाला लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन व पत्रकार संघाच्यावतीने शिलाई मशीन देऊन सहकार्य करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रेमकुमार फेरवाणी, डॉ.राजेंद्र पाटील यांच्यासह क्लबचे इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.