
नवीन नांदेड। महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक ,पहिले मराठी वृतपञकार, संपादक व दर्पनकार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांची जयंतीनिमित्याने दि ६ रोजी सहयोग सेवाभावी संस्थेच्यावतीने नवीन नांदेड भागातील पञकाराचा सत्कार करुन त्याचा सन्मान संस्थेचे सचिव डाँ संतुकराव हंबर्डे यांनी करुन जयंती साजरी केली .

सहयोग सेवाभावी संस्था, विष्णुपुरीच्या वतीने दि ६ रोजी दर्पनकार आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या जयंती निमित्याने त्याच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले , पत्रकार दिनाचे औचित्य साधुन परिसरातील नवीन नांदेड भागातील पञकाराचा सत्काराचे आयोजन केले होते . या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डाँ.संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तुकाराम सावंत , रमेश ठाकुर , किरण देशमुख , निळकंठ वरळे , अनिल धमने , तिरुपती घोगरे ,श्याम जाधव, शिवाजी राजुकर , संभाजी सोनकांबळे , दिगाबर शिंदे , संग्राम मोरे याचा सत्कार करण्यात आला . यावेळी पुढे बोलताना डाँ हंबर्डे म्हणाले , पत्रकार हा समाजातील अनिष्ठ परपरावर घाव घालुन समाजाचे प्रबोधन करतात . त्यामुळे समाजातील अन्याय विरुध्द आवाज उठवण्याचे काम होते . पञकार हा चोविसतास कार्यरत असतो. त्याच्या हातुन समाज घडवण्याचे काम होते . त्यामुळे त्याचा सत्कार होणे गरजेचे आहे . त्यामुळे पञकार दिनानिमित्य त्याच्या सत्काराचा योग आला हे माझे भाग्य आहे .यापुढे हि तुमच्या हातुन निर्भिड पञकारीता व्हावी हि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

यावेळी इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ प्रकाश कटकम ,कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य विश्वनाथ भरकड ,कॉलेज ऑफ एज्युकेशन चे प्राचार्य डॉ बालाजी गिरगावकर , इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस च्या डायरेक्टर डॉ गजाला खान ,इंदिरा स्कूलचे मुख्याध्यापक पुंडलिक वानखेडे ,इंदिरा पॉलिटेक्निक कॉलेजचे शिवानंद बारसे, ईशान अग्रवाल,बीसीए कॉलेजचे प्राचार्य सुनील हंबर्डे,मदर तेरेसा नर्सिंग स्कूलचे प्राचार्य सुनील पांचाळ ,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ स्वामी याची यावेळी उपस्थिती होती.

