
नांदेड/माहूर| तालुक्यातील मेंडकी येथिल रहिवाशी चंद्रभागाबाई टोपाजी पाटील यांचे आज दि.६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहते घरी अल्पशा आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले असून उद्या दि.७ रोजी सकाळी ११:३० वाजता मेंडकी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


सुशिल,मनमिळावू म्हणून मेंडकी परिसरात त्या सुपरिचित होत्या. कालवश चंद्रभागाबाई पाटील यांच्या निधनाने या परिसरात शोककळा पसरली आहे. संभाजी (बाळू) पाटील यांच्या त्या मोठ्या आई व कालवश जाबुवंतराव येरेकार खडकीकर, उपा. दिगांबर येरेकार, सुमनबाई मारोतीराव भवरे कामारीकर यांच्या त्या भगिनी तसेच,सुरेंद्र येरेकर खडकीकर यांच्या त्या आत्या आणि प्रभाकर मोरे,बाबासाहेब गायकवाड,भिमराव मोरे,कैलास गायकवाड,गौतम येरेकर यांच्या त्या नातेवाईक होत.

