
नांदेड। पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून दरोड्यातील तीन आरोपीतांकडून गुन्हयात वापरलेल्या हत्यारसह एकुण 1,28,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दिनांक 30/12/2022 रोजी फिर्यादी सतिश पि.रमेशलाल राठौर, वय 56 वर्ष व्यवसाय व्हिडीओ सिनेमा चालक, रा. शंकर नगर, वसरणी नांदेड यांनी पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे येवून फिर्याद दिली की, दिनांक 26/12/2022 रोजी 21.00 वाजण्याचे सुमारास बाजेगाव येथून त्यांचे व्हिडीओ सिनेमागृह बंद करून परत आपल्या घरी वसरणीकडे धनेगाव चौक मार्ग जात असताना राजराजेश्वर अँटोमोबाईल्स दुकानासमोर एका काळ्या रंगाच्या मोटार सायकल क्रMH-26- 7611 या गाडीवर तीन अनोळखी इसम त्यांची मोटार सायकल फिर्यादीचे मोटार सायकल समोर उभी करून खंजरने फिर्यादीचे डावे हाताचे अंगठ्यावर जबर दुखाप करून फिर्यादीचे खिशातील नगदी 3500/- रु. रेडमी कंपनीचा मोबाईल किंमती अंदाजे 5000/- रु. हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या एक 03 ग्रॅम वजनाची किमती 9000/-, एक 04 ग्रॅम वजनाची 12000/- व गळ्यातील सोन्याची 10 ग्रॅम वजनाची चैन किंमती 30,000/- रु.चे असा एकूण 59,500/- रुपयेचा माल तसेच फिर्यादीच्या गाडीची चाबी व फिर्यादीचे खिशातील पाऊच ज्यामध्ये फिर्यादीचे बँकेच ATM, ड्रायव्हींग लायसन्स, आधार कार्ड इत्यादी जबरीने चोरून नेले आहेत वगैरे फिर्याद वरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे गुरनं 781/2022 के 394,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास पोउपनि श्री बालाजी नरवटे हे करत आहेत.


सदर गुन्हयात गेला मालाबाबत व अज्ञात आरोपीबाबत माहीती काढून आरोपी 1 शेख मुखीद ऊर्फ गुजर पि.शेख नईम वय 22 वर्ष, व्यवसाय मिस्त्रीकाम रा. मोहमदीया कॉलनी वाजेगाव ता.जि. नांदेड 2. शेख इलीयास पि.शेख खदीर वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. मुदखेड रोड वाजेगाव ता.जि.नांदेड 3. सय्यद आतीक पि. सय्यद हुस्सेन वय 19 वर्ष, व्यवसाय बेकार रा. मोहमदीया कॉलीनी वाजेगाव ता. जि. नांदेड यांचा शोध घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे सदर गुन्हयातील गेला मालाबाबत तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याबाबत सांगीतले व त्यांचेकडुन सदर गुन्हयातील गेला माल व गुन्हा करतांना वापरलेले हत्यार व मोटार सायकल असा खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.


(1) एक रेडमी कंपनीचा 5A मोबाईल किंमती अंदाजे 5000/- रु. (2) गुन्हा करण्यासाठी वापरलेली हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्पेलंडर मोटार सायकल जिचा क्र. MH-26-E-7611 असा असलेला ‘जु.वा. .कि.अ.30,000/- रु.ची. (3) एक आयटेल कंपनीचा मोबाईल किंमती 5000/-, (4) एक रेडमी कंपनीचा नोट 9 प्रो मोबाईल किंमती 15000/-, (5) एक ओप्पो कंपनीचा मोबाईल किंमती 20,000/-, (6) एक 3 ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत 9000/- रु (7) एक 4 ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत 12000/- रु, (8) एक गळयातील सोन्याची चैन वजन 10 ग्रॅम किंमत 30000/- रु, (9) नगदी 2000/- रुपये, (10) एक गुन्हयात वापरलेले खंजर असा एकुण 1,28,000/- रु चा मुद्देमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला. सदर आरोपी दिनांक 01/01/2023 रोजी अटक करुन त्यांचा दिनांक 07/01/2023 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांचेकडे तपास करुन त्यांचेकडे वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीतांकडे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

संबंधीत कार्यवाही मध्ये पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथिल गुन्हे शोध पथकातील पोउपनि श्री आनंद बिचेवार, पोहेकॉ / 2434 प्रमोद कन्हाळे, पोहेकॉ 741 प्रभाकर मलदोडे, पोहेकॉ / 492 संतोष जाधव, पोहेकॉ/2127 बालाजी लाडेकर, पोकों/3376 चंद्रकांत स्वामी, पोकों/1073 विश्वनाथ पवार पोना / 1243 ज्ञानोबा कवठेकर, पोकों/ 2866 शिवानंद कानगुले यांनी गुप्त बातमीदारांमार्फतीने माहीती काढून व प्रत्येकाने वेगवेगळे कौशल्य वापरून सदर गुन्ह्यातील आरोपीतांची माहीती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदर उल्लेखनिय कामगीरीबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अविनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक नांदेड, सिद्धेश्वर भोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
