
नविन नांदेड। नरसिंह विघा मंदिर प्राथमिक शाळा सिडको येथे सर्व विषयांच्या प्रकल्प प्रदर्शनांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विषयांवरील अनेक प्रकल्प तयार केले या प्रकल्पा मान्यवरांसह पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


नरसिंह विद्या मंदिर प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे दि.६ जानेवारी रोजी आकारीक मूल्यमापन द्वीतीय सत्र अंतर्गत वर्ग पहिली ते चौथी च्या सर्व विषयाचे प्रकल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या प्रकल्प प्रदर्शन चे उद्घाटन जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यालय सिडको नांदेड चे प्राचार्य विश्वासराव हंगरगेकर ,दैनिक गोदातीर समाचार नांदेड सिडको चे पत्रकार रमेश ठाकूर ,नरसिंह विद्या मंदिर प्रा शाळा सिडको नांदेड च्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना एकुंडवार ,शिवाजी विद्यालय सिडको नांदेड चे समन्वयक साहेबराव देवरे होते.


हे प्रदर्शन पाहण्यासाठी सिडको हडको परिसरातील पालक ,विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या प्रदर्शना च्या यशस्वीते साठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ,या प्रदर्शनात विद्यार्थी व विद्यार्थिनीनी आकर्षक अशी वेशभूषा व विविध विषयांवरील प्रकल्प व किल्ले, निवास, इमारती, गणीत, ईतीहास यासह शरीरातील अनेक अवयव यांचे सादरीकरण कलाकृती मधुन साकारले होते.


प्रदर्शन साठी प्रत्येक वर्गासमोर आकर्षक रांगोळी व प्रकल्पाचे सादरीकरण करून सजावट करण्यात आली होती, यासाठी संबंधित वर्गाच्या शिक्षीका व शिक्षक ,शिक्षेकतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करुन प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
